
दैनिक चालू वार्ता परभणी जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिल्हाधिकारी कार्यालय आयोजित “विविधतेत एकता” या सांस्कृतिक कार्यक्रमांत अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन नृत्यांगनाचा कलाविष्कार प्रदान करीत अंगी असलेल्या सुप्त कला गुणांना वाव दिला.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी आपल्या कार्यालयीन दालनात भव्य अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन दररोज संध्याकाळी साडे सहा ते साडे आठ या दरम्यान केले आहे. अकरा ते चौदा ऑगस्ट दरम्यान आयोजित या सांस्कृतिक कार्यक्रमांत विविध संस्थांमधील बाल कलाकारांनी सहभाग घेतलाआहे. यामध्ये “दिव्यांगाचा नृत्याविष्कार” हा कार्यक्रम अत्यंत बहारदार व डोळ्यांचे पारणे फेडणारा असाच ठरला गेला आहे. “मिले सूर मेरा तुम्हारा” ध्वज गीत, पोलीस बॅंड, फॅ वन शो, भारत की दिप्ती शलाका इत्यादी सांस्कृतिक कार्यक्रमांची अदाकारी या बाल कलाकारांनी सादरीकरण करुन समस्त विद्यार्थी व पालक श्रोत्यांना खिळवून ठेवणारे ठरले.
स्व.सौ. कमलाबाई जामकर महिला महाविद्यालय पोलीस दल, श्री संत पाचलेगावकर महाराज निवासी अस्थिव्यंग महाविद्यालय, जिंतूर, रणवीर मराठवाडा हायस्कूल, बाल विद्या मंदीर हायस्कूल या व अन्य ब-याचशा शैक्षणिक संस्थांनी यात सहभाग घेऊन विविधतेमधून सांस्कृतिक एकता प्रदर्शित केली.
जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या पुढाकारानेच प्रशासकीय कामाबरोबरच राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्राभिमान, सांस्कृतिक एकता, भारतीय आचारसंहितेचे अनुकरण व आचरण, नियम प्रणालीचा अंमल आणि दंडात्मक कारवाईचा बडगा या सारख्या अनुज्ञेय व शासन प्रणाली एकसाथ आचरणात आणणे शक्य होत आहे, त्याशिवाय त्यांनी आयोजिलेल्या नि अंमलात आणलेल्या राष्ट्रीय सांस्कृतिक कार्यक्रमांचा आदर्श कायम डोळ्यासमोर राहिलं एवढे नक्की !