दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत पेनूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व हायस्कूलच्या मुख्याध्यापक मारोती सोने व संदीप साखरे यांच्या नेतृत्वात विविध भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन संपन्न होत असून कार्यक्रमास जोरदार असा प्रतिसाद मिळत आहे. आज जिल्हा परिषद हायस्कूल व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या पुढाकाराने गावातील प्रमुख मार्गाने भव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात आली.
गावाच्या मुख्य मार्गावरून या रॅलीने शिस्तबद्ध पद्धतीने आपले संचलन केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आझादी का अमृत महोत्सव निमित्त हर घर तिरंगा ही मोहीम कन्याकुमारी ते काश्मीर पर्यत राबवली जात असून संपूर्ण देशात या मोहिमेस अभूतपूर्ण असा प्रतिसास भेटत आहे. या मोहिमेस देशवाशिया तर्फे प्रचंड प्रतिसाद भेटताना दिसून येत असल्याची माहिती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संदीप साखरे यांनी दिली. त्यांनी सुद्धा प्रत्यक्ष हातात तिरंगा घेऊन या रॅलीत सहभाग नोंदविला.
या रॅलीत सोनखेड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भोसले, केंद प्रमुख नागोराव जाधव, शालेय समिती सदस्य प्रतिनिधी तथा पत्रकार विरभद्र एजगे, तलाठी इंगळे जिल्हा परिषद हायस्कूलचे मुख्याध्यापक सोने सर यांच्या सह हायस्कूलचे सर्व शिक्षक, शिक्षिका यांच्या सह सर्व कर्मचारी यांची तिरंगा रॅली सहभागी होते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संदीप साखरे व त्याचे सहकारी शिक्षक कर्मचारी या असंख्य विद्यार्थ्यांचा समावेश होता. एकूणच या तिरंगा रॅलीने गाववाशियाचे लक्ष वेधून घेतले होते.
या वेळी शालेय समिती अध्यक्ष मदन पाटील गवते, उपाध्यक्ष चंद्रकांत एडके, समिती सदस्य प्रतिनिधी तथा पत्रकार विरभद्र एजगे, राम पाटील गवते, गोवर्धन पाटील गवते, प्रकाश आगलावे, गंगेश पाटील गवते यांच्या सह आदींचा समावेश होता.
