
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी -श्री. रमेश राठोड
——————————-+-+———
सावळी सदोबा-आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा परिसरातील खर्रा खाणाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून, शासन व्यसनमुक्त देश घडवण्याचा प्रयत्न करत असून त्यावर आमाप पैसेही खर्च करत जनजागृती करीत आहे,मात्र सावळी सारख्या ग्रामीण भागात खर्रा खाण्यार्याचे प्रमाण वाढत आहे,त्यात लहान मुलांपासून तर मोठ्यापर्यंत व्यसनाचा आहारी गेले आहेत,महिलांमध्येही खर्रा आवडीच्या असल्याने दिसून येत आहे, पाणठेल्यावर सुगंधित तंबाखू पासून तयार करण्यात आलेला खर्रा हा विस रुपयापासून ते चाळीस रुपयापर्यंत सहज मिळत असतो,सकाळपासूनच पणठेल्यावर कामकरी,सरकारी नोकर मजूर शाळेतील मुले तर मुलांना शिकवणारे काही शिक्षक खर्रा घेतल्याशिवाय कामाला सुरुवात करीत नाही,अलीकडे सरकारने या सुगंधित तंबाखू व त्यापासून तयार होणाऱ्या विविध वस्तूवर निर्बंध लावले होते परंतु तरीही यात घट होण्याऐवजी वाढ होताना दिसत आहे,यामुळे नागरिकांना विविध आजार जडलेले आहे शासनाच्या व्यसनमुक्ती योजनेचे तीन तेरा वाजले असून संबंधित अधिकाऱ्यांची दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे, प्रशासनाच्या नियमाची कठोर पालन झाले असते तर देशातील युवक आज वेशनाधिन झालाचं नसता, त्यामुळे प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्याची काळाची गरज असून, यावर कारवाई करण्याची मागणी शूज्ञ नागरिकाकडून होत आहे