दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा. भारताचा पहिला अवकाश यात्री राकेश शर्मा जेव्हा आकशातून पृथ्वीला चक्कर मारत होता जेव्हा त्याचे अकाशयान भारतावरून जात होते तेव्हा तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरागांधीजीनी राकेश शर्माला विचारले , “अवकाशातून भारत कसा दिसतो ? ” तेव्हा राकेश शर्माने पटकण उतर दिले , ” सारे जहाँसे अच्छा हिंदोस्ता हमारा”
जगातील प्राचीन देशांपैकी भारत हा एक देश आहे.आपल्यादेशावर प्राचीन काळी अनेक रांनटी टोळ्यांचे आक्रमणे झाली.अनेक परकीय लोक भारतावर आक्रमण केले ;पण भारत देश आजतागयत ताठ मानेने उभा आहे.येथे अनेक परकीय संस्कृतीचं आक्रमण झालं. भारतीय संस्कृती,परंपरा नष्ट करण्याचे प्रयत्न झाले ;पण भारतीय संस्कृतीत तशाही परिस्थितीती जोमाने फुलत राहीली.डोलत राहीलीे. भारतीय संस्कृती सतत जोमाने तगधरून राहीली. भारताची संस्कृती ही प्राचीन आहे.जगात अनेक संस्कृती उदयास आल्या.त्या काहीकाळ टिकल्या व त्या नंतर काळाच्या पोटात गडप झाल्या.त्या लयास ही गेल्या. त्या इतिहास जमा झाल्या; पण भारतीय संस्कृती जगात ताठ मानेने उभी आहे.पुढे राहणार आहे.
आपल्या देशावर अनेक परकीय शक्तीने आक्रमणे केली.भारतीयावर अत्याचार केले.मुळवंशी लोक तरी त्यांच्यासमोर टिकून होते. इंग्रज लोक तर व्यापाऱ्याच्या निमित्याने आले व येथे दिडशे वर्ष राज्यकर्ते बनले.इंग्रजानी भारतीयावर आन्याय केले. त्यांची संस्कृती आपल्यावर थोपवण्याचे प्रयत्नही केले ; पण त्यांना गोर्यांना यश आलं नाही.गोर्यांनी आपल्याल्या बऱ्याच चांगल्या गोष्टी दिल्या ; पण त्याचबरोबर भारताला कंगालही बनविले.कोणे एकेकाळी भारताला सर्व जग सोनेकी चिडीया म्हणायचे इंग्रजानी त्या चिडीयाचे सोनेरी पंख उपटून घेवून गेले. बिन पंखाची चिडीया तेवढी इंग्रजानी येथे ठेवली होती. भारतीयांना गुलामांसारखी वागणुक देत इंग्रजांनी भारतात निर्माण होणारा कच्चा माल कमी दामात त्यांच्या देशात नेऊन पक्का माल जास्त दराने भारतात विकायचे.
भारत हा बुद्धाचा देश. भारत हा महाविराचा देश. शांत राहाणे म्हणजे गुलामी सहन करणे नव्हे.हळूहळू भारतीय लोकांत राजकीय जागृती निर्माण होवू लागली. आम्ही भारतीय आहोत व भारत माझा देश आहे ही संकल्पना भारतीयात हळूहळू पेरली गेली.मग ती भारतीयात रुजायला लागली.आम्ही भारतीय आहोत.भारत आमचा देश आहे.हा देश फक्त भारतीयाचा आहे म्हणून गोर्यांना येथून पळवून लावण्याची तयारी भारतीयांनी केली.व शेवटी १५ ऑगस्ट १९४७ रोजी गोरे लोक भारत सोडून निघून गेले.या घटनेला ७५ वर्ष पूर्ण होत आहे .
स्वंतत्र भारताचं वय ७५ वर्ष.एखाद्या देशाचं हे वय म्हणजे फार ज्यास्त नाही. देशाचा विचार केला तर भारत आणखी कुमारवयातच रमतोय.वय कुमारचं असेल पण ज्ञान ,संस्कृती व जागतिक धोरणात आपला देश जगाचा गुरु बनू पहातोय. भारत म्हणजे जगाचा शांतीदूत आहे.शांततेसाठी भारत नेहमीच जगासाठी आदर्श ठरत आला आहे.
स्वातंत्र्यानंतर भारताने काय कमावलं व काय गमावलं ?
कपटी दुष्ट गोरे यांनी फोडा आणि झोडा ही निती वापरून भारतात राज्य केलं. त्यांची ही निती भारतीयांना कळाल्यानंतर इंग्रजाला सळोकी पळो करून सोडले. गोरे लोक हिंदू मुस्लीम यांना एकमेकांच्या विरुद्ध उभं केलं त्यांची नितिच होती ना फोडा आणि झोडा.त्याप्रमाणे त्यांनी भारतीयांचे अखंड भारताच्या स्वप्नांचे तुकडेतुकडे केले.व ते जाता जाता भारतातून पाकिस्तानला भारतापासून आलग केले.भारताने पाकिस्तान हा आपला भूभाग गमावला.
नंतर पाकिस्तानी रानटी टोळ्या व त्यांच्या सैनिकांनी जम्मू काश्मीरचे लचके तोडले तर चीनने अक्साई चीन गिळून बसलाय हे आपण स्वातंत्र्यानंतर गमावलोय . आजही पाकिस्तान चीन भारताची नेहमीच खोडी काढत असतात.
पाकिस्तान ,चीन व अमेरिका हे एक होते. अमेरिका नेहमीच यांना खोडीपणाचा बारुद पुरवत राहीलाय त्यासाठी भारताने १८ मे १९७४ रोजी पोखरण मध्ये अणुचाचणी घेतली. ही अणुचाचणी कोणाच्या विरोधात नव्हती. या मोहिमेला नावच देण्यात आलं होतं ‘आणि बुद्ध हसला ‘ अणुबॉम्ब चाचणी करताना बुद्ध का हसला? यातून भारताला जगाला दाखवून द्यायचे होते. भारत शांतता प्रिय देश आहे. शेजारच्या देशाबरोबर युद्ध झालंचं व त्या देशाकडे अणुबॉम्ब नसेल तर भारत त्या देशाविरुद्ध अणुशक्ती वापरणार नाही. भारत कधीही प्रथमअणुबॉम्बचा वापर करणार नाही. भारत हा अणुबॉम्बधारी जगात जे काही मोजके देश आहेत त्यादेशांच्या फक्तीत ताठ मानेने शामिल झालेलं आहे. स्वातंत्र्यानंतरची ही आपली उलब्धी आहे . भारताने या नंतरही अणुबॉम्ब चाचणी घेतलेली आहे .
इंग्रजाच्या काळातील शिक्षण फक्त त्याच्या सोयीसाठी होतं.फक्त कारकून निर्माण करण्याचे शिक्षण ते देत होते.भारतीय शिकले तर ते जागृत होतील ही त्यांना भिती होती.लॉर्ड मेकाले यांनी शिक्षणाचा झिरपण्याचा सिद्धांत मांडला होता.वरिष्ठ जातींना शिक्षण दिलं की ते झिरपत झिरपत खालपर्यंत पोहचेल हे त्यांचं धोरण होतं
भारत स्वंतत्र्य झाल्यानंतर १९५१ मध्ये भारतात साक्षरतेचं प्रमाण होत फक्त १९.३% आज हेच प्रमाण जवळपास ८० ते ९० % पर्यंत पोहचले.केरळसारखं राज्यतर संपूर्ण साक्षर झालंय . १९५०-५१ ला भारतात विद्यापीठांची संख्या होती फक्त २७ आज घडीला भारतात वेगवेगळ्या प्रकारची १००० वर विद्यापीठे कार्यरत आहेत.याच विभाजन करायचं असेल तर ५४ केंद्रीय विद्यापीठ , ४१६ राज्य सरकारची , १२५ डीम्ड विद्यापीठ , ३६१ खाजगी विद्यापीठ व १५९ इतर म्हणजे एम्स सारखी विद्यापीठे आहेत. भारताची ही स्वातंत्र्यानंतरची मोठी यशवंत भरारी आहे .
भारत तंत्र शिक्षणातही मागे नाही भारतात मुंबई , चेन्नई , दिल्ली , खरगपूर , कानपूर व रुरुकी येथे जागतिक दर्जाच्या आयआयटी आहेत.देशात एनआयटीच्या १७ संस्था आहेत.भारतात १९५०-५१ साली वैद्यकीय महाविद्यालये फक्त २८ होती.आजघडीला ५९० महाविद्यालये व ६४ पीजी महाविद्यालये कार्यरत आहेत.जवळपास सर्वच राज्यात कृषी विद्यापीठ व महाविद्याल आहेत.ही आपल्या देशाने केलेली प्रगती आहे.
भारत सरकारणे तर ९३ व्या घटनादुरुस्ती नुसार शिक्षण सक्तीचे केले आहे. ६ ते १४ वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण दिले जाते.शिक्षण हा बालकांचा मुलभूत हक्क आहे.
भारत हा जगातील एक शांतता प्रिय ;पण जगातील एक सामर्थशाली देश बणण्याच्या मार्गावर आहे. सामर्थशाली देश बनण्यापासून आपणास कोणीच रोखू शकणार नाही.भारत स्वतंत्र झाल्यानंतर नंतर तो ना अमेरिका गटात गेला ना रशियाला जवळ केले. भारत कोणाचाही बगल बच्चा न बणता भारताने स्वतंत्र परराष्ट्र संबंध ठेवले. अलिप्ततचे धोरण हे भारतासाठी त्या काळीही फायद्याचे ठरले आजही ठरत आहे. भारताने आपले परराष्ट्र धोरण बदलले नाही. म्हणूनच आज सामर्थ्यशाली देशाचे राष्ट्रप्रमुखही आपल्या पंतप्रधानाच्या समोर लाळ घोटत आहेत.अमेरिका रशिया इंग्लंड फ्रांस या सारखी राष्ट्र भारताला त्यांच्या बरोबरीचा दर्जा देत आहेत.भारत ताठ मानेने आज जगात वावरत आहे.अलिप्त धोरणाचे हे फलित आहे.
एक काळ असा होता येथे भारतीय उपासमारीने मरत होती अन्नधान्याची कमतरता होती.आठवड्यातून एकदिवस उपाशी रहा व अन्नधान्य वाचवा आशी हाक सर्व भारतीयांना देण्यात आली होती.स्वातंत्र्यानंतर भारताने हरित क्रांती घडवून आणली. धवल क्रांती घडवून आणली. भारतीय शेतकऱ्यांनी आपर कष्ट उपसले व देशाला अन्न धान्याच्या बाबतीत स्वंयपूर्ण बनविले.आज भारत जगाला अन्नधान्य पुरवित आहे.
भारताने १९५०च्या शेवटी भारतीय अंतरीक्ष केंद्र , अणुऊर्जा,विज्ञान, उद्योगक्षेत्रात भरारी घेतली. १९७०च्या दशतकात भारत स्वदेेशी अणुऊर्जा यंत्र बनविले.भारताने सेवाक्षेत्रात ही रग्गड प्रगती केली आहे . टेली कम्युनिकेशन ,सूचना व औद्योगिकरणात वाढ झालेली आहे.भारतात बहुराष्ट्रीय कंपन्याचे आगमण झाल्यामुळे लोकांना रोजगार उपलब्ध झालेलं आहे.भारतात ६० च्या दशकात केवळ ४.५% लोकांना रोजगार उपलब्ध होता.तो आजच्या घडीला अंदाजे ६५% ते ७० % लोकांना रोजगार उपलबध झालेला आहे.
शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सोयी सवलती, कृषी ज्ञान ,नवनविन शोध भुमिसुधार योजना आमलात आणल्या जात आहेत.ग्रामीण लोकांसाठी ही वेगवेगळ्या योजना राबविल्या जात आहेत.भूमीहीनाना भूमि, घरकुल निवास योजना, गोरगरीबाना ही अनेक योजना अनेक सवलती शासन उपलबध करून देत आहेत. व दिलेलीे आहेत.
स्वातंत्र्यापूर्वी भारत वेगवेगळ्या जाहगीदारी, संस्थानिकात विभागला गेला होता.भारताची अर्थव्यवस्था विखुरलेली होती.भारतात निरक्षतेचं राज्य होतं. अश्चर्यचकित करणारी गरीबी गरीबांवर अन्याय करत होती. गावातील एखादी शिकलेला व्यक्ती त्या गावातील लोकांवर त्याच्या मनाप्रमाणे वागायाला लावत होता.भारत स्वंतत्र झाल्यानंतर पहिली चाळीस पन्नास वर्ष पंचवार्षिक योजना प्रमाणे विकास होत राहिला. पण १९९१ नंतर भारतीय अर्थ व्यवस्थेने उभारी घेतली. भारतात मुक्त बाजारपेठेचे युग सुरु झाले. मुक्त बाजार पेठेचा भारतात प्रवेश झाला.यामुळे भारतीयाच्या हातात रुपया नाचायला लागला . खुळखुळायला लागला.
भारतात स्वातंत्र्यपूर्वी राजमार्गाची लांबी फक्त २४००० किमी होती.आज तर भारतभर रस्त्याचे जाळेच विणले जात आहेत.देश जोडण्याचं व प्रगतीचं रस्ते हे प्रमुख साधन आहे.रस्ते देशाचे रक्तवाहिण्या आहेत. स्वातंत्र्यानंतर देशात रेल्वेचाही विस्तार झालेला आहे.
भारतात आरोग्य सुविधात ही वाढ झालेली आहे.गरिब लोकांसाठी सरकारने अनेक आरोग्य योजना काढलेल्या आहेत. खेड्यातपर्यंत या योजना पोहचवण्याचा सरकार प्रयत्न करत आहे.आता सगळीकडेच हेल्थ केअर सेन्टर स्थापन करत आहे .
अंतरिक्ष योजनेत भारत स्वंयपूर्ण बनू पहात आहे. १९७५ मध्ये पहिला उपग्रह ज्याचे नाव आर्यभट्ट होते ते आवकाशत सोडण्यात आले . त्यावेळी आपण परावलंबी होतो ;पण भारत आता यात जवळपास स्वंयपूर्ण झालेलं आहे.आपल्या अंतरिक्षयानातून दुसऱ्या देशाचे उपग्रह सोडण्यात येत आहेत.२०१३मध्ये भारताने मंगल यानाचे प्रक्षेण केले.ते २४सप्टेंबर२०१४ मध्ये मंगळ कक्षात स्थिरावले आहे.
भारत हा आता प्रत्येक क्षेत्रात स्वयंपूर्ण बनण्याच्या मार्गावर आहे. प्रत्येक क्षेत्रात भारताची यशस्वी वाटचाल चालू आहे. आपली सैन्य शक्तीही वाढलेली आहे. अनेक प्रकारे युद्ध आयुध भारत तयार करत आहे.ब्रम्होस सारखं क्रुज मिसाईल भारताने बनविले आहे.जल,स्थल व आकाश या तिन्ही क्षेत्रावर भारत हुकूमत गाजविण्यासाठी सक्षम बनत आहे.भारत हा बुद्धाचा देश आहे.त्यामुळे भारत आक्रमक कधीच बननार नाही.भारताचं अलिप्ततेच धोरणच भारताला बलशाली बनवत राहील. भारत जगाचा मार्गदर्शक बनेल.भारत जगाच्या वाटाड्या बनेल.तो शांतीदूत बनून जगाला “जय जगत ची ” व “सत्य मेव जयते “ची शिकवण देत राहील .
राठोड मोतीराम रुपसिंग
विष्णुपूरी, नांदेड -६
९९२२६५२४०७
