
दैनिक चालू वार्ता जिल्हा उपसंपादक- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त शहर पोलीस दलातर्फे आज शनिवार, दि. १३ ऑगस्ट २०२२ रोजी परभणी शहराच्या विविध भागांतून “फ्लॅग मार्च” काढण्यात आला.
पोलीस अधीक्षक मुख्यालयापासून सुरु करण्यात आलेला हा फ्लॅग मार्च वसमत रोड, काळी कमान, अपना कॉर्नर, तेथून पुढे जेल मार्गे जिंतूर रोड, तेथून स्काय ओव्हर ब्रिज, एस्. टी. बस स्थानक, रेल्वे स्थानक परिसर व पुढे पोलीस अधीक्षक मुख्यालय येथे सांगता करण्यात आली.
या फ्लॅग मार्चमध्ये शहरी व वाहतूक दल, विशेष कृती दल, दंगल विरोधी पथक, विविध पोलीस ठाण्यांतील अधिकारी व कर्मचारी वर्ग लक्षणीय संख्येने हातात फ्लॅग घेऊन मार्च करीत होते.
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शहर पोलीस दलातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. एकूणच पोलीस दलातील विविध वाहने, गणवेश परिधान सारे पोलीस हातात घेतलेल्या फ्लॅग मुळे शहरांतील नागरिकांचे लक्ष्य वेधक असेच ठरले होते.