
दैनिक चालू वार्ता कंधार तालुका(ग्रामीण)प्रतिनिधी बाजीराव गायकवाड-
कंधार:-बारुळ ते पेठवडज या रोडवर .बारुळ पासून एक किलोमीटर अंतरावर हा पुलाचे बांधकाम चालू आहे,पर्यायी रस्ता अपुरा आहे.पावसाच्या पुरामुळे रस्ता वाहून गेला आहे.गुत्तेदार पर्यायी रस्ता करून देत नाही. त्यामुळे मुखेड आगाराची बस जवळपास एक महिन्यापासून बंद आहे. वरवंट व रहाटी येथील शाळेचे विद्यार्थाची गैरसोय होत असून इतरही रहदारी बंद आहे.संबंधित गुतेदारास वेळोवेळी कल्पना देऊनही काहीच उपयोग होत नाही.त्यामुळे बारुळ ते पेठवडज या रस्त्यावरील
एक किलोमीटर अंतरावर पुलाचे बांधकाम चालू असून पर्यायी रस्ता तात्काळ उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जाधव व्यंकटी गोविंद, व्यंकटी ईटकापल्ले, पांडुरंग कंधारे, विठ्ठल गायकवाड, शरद गायकवाड यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग नांदेड यांच्याकडे केली आहे. तरी पर्यायी रस्ता 10आॅगस्टपर्यंत पूर्ण करून द्यावा.अन्यथा सार्वजनिक बांधकाम विभागासमोर 14 आॅगस्ट रोजी उपोषणानास बसण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते व्यंकटी जाधव यांनी दिला आहे.