दैनिक चालू वार्ता लोहा प्रतिनिधी -राम कर्हाळे
लोहा :- तालुक्यातील संजय गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कलंबर येथे शाळेतील सर्व स्टाॅपच्या वतीने श्री. रमेश कर्हाळे सर यांचा शाल, श्रीफळ, हार घालून सत्कार करण्यात आला. त्यांना मराठवाडा शिक्षक संघ तालुका लोहा यांची जबाबदारी दिली असून ती योग्य प्रकारे पार पाडतील अशी शुभेच्छा स्वामी सर यांनी दिल्या. डांगे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. शिनगारे सर, गायकवाड सर, वाघमारे सर,पि.शिंदे सर, मुंडे सर, भालेराव सर, एस. पी. जंगमे , सिरसाट सर, लोहकरे सर, अ. घोरबांड सर, अ. कदम सर, च. कदम सर, पानपट्टे सर, वि. जंगमे सर, तुप्पेकर सर,दैनिक चालू वार्ता कंधार तालुका ग्रामीण चे प्रतिनिधी बाजीराव गायकवाड सर, कदम मॅडम, सोळंके मॅडम, गोरे मॅडम, कंधारे मॅडम हे सर्व जण सत्कार समारंभात सहभागी झाले होते. सर्व स्टाॅपच्या वतीने पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
