
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलूर:आज देगलूर येथे गणेश उत्सव 2022 संबंधाने राजशेखर मंगल कार्यालय रामपूर रोड देगलूर या ठिकाणी दिनांक 23.08.2022 रोजी सकाळी ठीक 11.00 वा पोलीस ठाणे देगलूर तसेच तालुका प्रशासनाच्या वतीने शांतता समितीची मीटिंग आयोजित करण्यात आली होती देगलूर शहर व देगलूर तालुक्यातील हद्दीतील सर्व आजी / माजी आमदार साहेब , आजी / माजी नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष , जि प / पंचायत समिती सदस्य , आजी / माजी सर्व नगरसेवक , शांतता समिती सदस्य , पत्रकार बांधव , व्यापारी बंधू , डॉक्टर , इंजिनियर , सर्व सार्वजनिक गणेश मंडळाचे पदाधिकारी , महिला दक्षता समिती चे सदस्य , पोलीस पाटिल , तंटामुक्ति अध्यक्ष , सरपंच , उपसरपंच , प्रतिष्ठित नागरिक सदर बैठकीत उपस्थित होते त्यावेळी तालुक्याचे तहसीलदार साहेब राजाभाऊ कदम यांनी गणेश उत्सवाबद्दल सर्व गणेश भक्तांना मार्गदर्शन केले व उपविभागीय पोलीस अधीक्षक श्री सचिन सागळे साहेब यांनी गणेश उत्सवाबद्दल नियमावली व डीजे बाबत सर्व गणेश भक्तांना सूचना दिल्या त्यावेळी देगलूर पोलीस स्टेशनचे पीआय सोहम माच्छरे सर तसेच देगलूर चे सी ओ साहेब आधी प्रतिष्ठ मंडळी उपस्थित होते.