
विकास नियंत्रण नियमावली 15 अंतर्गत 4 हजार चौरस फुटापेक्षा मोठ्या भूखंडाच्या पुनर्विकासाच्या अंतर्गत राबवलेल्या निवासी प्रकल्पातून मुंबई महापालिकेला विविध ठिकाणी तब्बल 800 घरे उपलब्ध झाली आहेत.
या सर्व घरांचा ताबा पालिकेला मिळाला आहे. मात्र, या दिवाळीत 800 पैकी 586 घरांची लॉटरी सोडत काढण्यात येणार आहे. उर्वरित 214 घरे प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव (PAP) ठेवली जाणार आहेत. सदर 586 घरांपैकी 186 घरांसाठी मंजुरी मिळाली असून आठवडाभरात उर्वरित घरांना मंजुरी मिळणार आहे. या संदर्भातील माहिती पालिका सूत्रांकडून देण्यात आली आहे.
मुंबई शहर आणि उपनगरे येथे 4 हजार चौरस फुटांपेक्षा जास्त आकाराच्या मोठ्या भूखंडावर पुनर्विकास प्रकल्प राबविताना निवासी बांधकाकामांतून उपलब्ध होणाऱ्या 80 टक्के घरांची विकासकांकडून विक्री केल्यानंतर 20 टक्के घरे पालिकेला मोफत देणे अपेक्षित असते. त्यानुसार महापालिकेला तब्बल 800 घरे उपलब्ध झाली आहेत. मात्र, ही घरे अल्प उत्पन्न गटात मोडणाऱ्यांना लॉटरी काढून प्राधान्याने विकण्यात येणार आहेत. सध्या मुंबईत मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरू आहेत. महापालिकेला प्रकल्प बधितांना देण्यासाठी अपेक्षित पर्यायी घरे उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रकल्प बाधितांची कोंडी होत आहे.
मुंबईत विकास प्रकल्प राबवताना महापालिकेला प्रकल्प बाधितांना पर्यायी घरे उपलब्ध करून देताना नाकीनऊ येत आहे. पालिकेला या घडीला किमान 2 लाख पर्यायी घरे हवी आहेत. जेव्हाही की पालिकेला तेवढी घरे उपलब्ध होण्यात अडचणी येत आहेत. मात्र, महापालिकेला प्राप्त 800 घरापैकी 214 घरे प्रकल्पग्रस्तांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. मुंबईत विविध विकास प्रकल्पामुळे घरे बाधित होत असतात. यातील पात्र असलेल्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पालिकेला करावे लागते.