
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी
देगलूर तालुक्यातील कोठेकलुर ते खतगाव रस्त्या सध्या स्थितीला अतिशय खराब झालेला आहे या रस्त्यावरून खतगाव शहापूर बोधन व बिलोली या मार्गावरून जाणाऱ्या सर्व गाड्या बंद आहेत त्यामुळे शालेय विद्यार्थी व तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी व गावातील नागरिकांना याचा मोठा त्रास असावा लागत आहे. ऐन पावसाळ्याच्या. दिवसांमध्ये या रस्त्यावर जीवघेणी खड्डे पडलेले दिसत आहेत. यामुळे गावातील लोकांना देगलूर ला बाजार करण्यासाठी दुचाकी चार चाकी याचा वापर करून जावे लागत आहे. जीव मुठीत ठेवून प्रवास करावे लागत आहे. कारण अपघाताचे प्रमाणात होण्याचे मोठे संकेत येथे दिसून येत आहे. तरी देखील सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे डोळेझाक करत आहे. जनतेचे प्रतिनिधी निवडणुकीच्या वेळेस आश्वासन देत असतात. आज घडीला या रस्त्याकडे कोणाच्याही नजरा दिसत नाही. फक्त मतदान घेण्यापुरते सर्व जनतेचे प्रतिनिधी दिसून यायला लागलेले आहे. या रस्त्यावर पावसाळ्याचा दिवस असल्यामुळे पाणीच पाणी दिसून येत आहे गाडी कुठून चालावी हा प्रश्न दुचाकी चार चाकी वाहन चालवणाऱ्या होत आहे. हा रस्ता गेल्या अनेक दिवसापासून अतिशय खराब झालेला आहे. एकीकडे अच्छे दिन से स्वप्न बघणाऱ्या सरकारला या रस्त्याचा विसर पडत आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या शाळेला ये जा करण्यासाठी अतिशय त्रास होत आहे. शैक्षणिक नुकसान होत आहे. तरी प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन हा रस्ता तयार करून देण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.