
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
जिवती तालुक्यात विविध समस्या भेळसावत असून तरी पण स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत आहे. या समस्यांचे निराकरण करण्यात यावे अशी मागणी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव यांनी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांची भेट घेत निवेदन दिले.
काल मंत्री संजय राठोड हे चंद्रपूर जिल्हाच्या दौऱ्यावर होते. त्या दरम्यान शासकीय विश्राम गृह चंद्रपूर येते चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक पांडुरंग जाधव यांनी त्यांची भेट घेतली.
जिवती येथे बस स्थानकाची निर्मिती करण्यात यावी, जिवती तालुक्यातील रोडगुडा येथे बंजारा समाजाचे संग्रालयाची वास्तू निर्मिती करण्यात यावी, बंजारा व विमुक्त भटक्या जमातील विद्यार्थ्यांकारिता वसंतराव नाईक यांच्या नावाने कृषी महाविद्यालय स्थापन करण्यात यावे, जिवती येथे एम. आय. डी. सी. ची निर्मिती करण्यात यावी, जिवती येथे राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, जिवती तालुका व परिसरात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज बांधव राहतात. तेलंगणा तील कुमराम भिमु यांच्या समाधी स्थळाच्या धरती वर जिवती तालुक्यात भव्य संग्रालय उभारण्यात यावे अश्या विविध मागण्यांचे निवेदन मंत्री संजय राठोड यांना दिले.
या सर्व मागण्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या सोबत बैठक आयोजित करण्यात येईल व त्या बैठकीला जिवती तालुका शिष्टमंडळाला प्रचारण करण्यात येईल असे आश्वासन राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांनी दिले.