
दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विज्ञानवादी व समतेच्या तत्वांवर आधारित अश्या बौद्ध धम्माची १४ ऑक्टोंबर १९५६ रोजी विजया दशमीच्या दिवशी नागपूर येथे लाखो अनुयायांसह दीक्षा घेतली त्या दिवसापासून हा दिवस ‘धम्मचक्र प्रवर्तक दिन’ म्हणून सगळीकडे साजरा करण्यात येतो.
जव्हार शहरातील यशवंतनगर(मोर्चा) येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे बौद्ध अनुयायी,सर्वसमावेशक नागरिकांच्या उपस्थितीत बाबासाहेबांच्या विचारांना अभिवादन करीत पुष्पहार अर्पण करण्यात आला.सार्वजनिक रित्या त्रिसरण पंचशील ग्रहण करून दसरा,अशोका विजया दशमी आणि धम्म चक्र प्रवर्तक दिन साजरा करीत शुभेच्छा देण्यात आल्या.
या वेळी सामाजिक कार्यकर्ते यशवंत देशमुख,राजेश धात्रक,नितीन बल्लाळ,जुनेद मेमन,पप्पू सावंत,सुमित तारापूरवाला,पत्रकार संदीप साळवे आणि इतर अनुयायी उपस्थित होते.