
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे
देगलूर: गजानन माध्यमिक विद्यालय तडखेल तालुका देगलूर येथे
दिनांक 06 आक्टोंबर 2022
या दिवशी विद्यालयातील मैदानावर,प्रा उत्तम कुमार कांबळे सरांचा वाढदिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री बालाजी इंगळे सर खानापूर,तर प्रमुख पाहुणे तथा अतिथी म्हणून प्रा.विजय शेरीकर, विकास नरबागे, अनिल हसनाळकर, संजय शिंगाडे,राजू वाघमारे उपस्थित होते.या वेळेस विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.तसेच विविध प्रकारच्या अभ्यासक्रमाविषयी माहिती सांगितली.
अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री लक्ष्मण भोसले सर यांनी केले