
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
पुणे आंबेगांव भागातील आदिवासी समाजासाठी लढा देणाऱ्या सरकारच्या रोजगार हमी योजनेत पडकई समाविंष्ट करण्यासाठीचे आंदोलन करणाऱ्या डिंभे धरण आदिवासींच्या ताब्यात देण्यासाठी चळवळ उभी करणाऱ्या ज्येष्ठ पर्यावरणवादी कार्यकर्त्या आणि शाश्वंत संस्थेच्या संस्थापिका कुसुम कर्णिक ताई यांचे वयाच्या ८९ वर्षी त्यांनी पुणे येथील खाजगी रुग्णालयांत गुरुवारी सकाळी घेतला अखेरचा श्वांस त्यांच्या पश्चांत मुलगा असून नातवंडे असा त्यांचा परिवार होता. आंबेगाव, जुन्नर ,खेड तालुक्यांत १९८० च्या काळात कुसुम ताई आणि त्यांचे पती स्वर्गीय आनंद कपूर या दोघांनी मिळून संस्थापक केलेल्या शाश्वंत संस्थेच्या माध्यमांतून आदिवासी भागांमध्ये भरपूर काम केले. त्यामध्ये डिंभे धरणाच्या पुनर्वसनाचा प्रश्न पडकई योजना, हिरडा प्रश्न आदिवासींचे प्रश्न रोजगार हमी योजना असे प्रलंबित प्रश्नं त्यांनी चांगलेच मार्गी लावले. त्यामुळे कुसुम ताई या आदिवासी यांच्या हक्कासाठी त्या नेहमी अहोरात्र लढत होत्या. त्यांनी मेघा पाटकर यांच्या समवेत नर्मदा बचाव आंदोलनातही त्यांनी सहभाग घेतला होता. कुसुम ताई यांनी असंघटित क्षेत्रात स्वतःसाठी रोजगार निर्माण करणाऱ्या असंख्य स्त्रियांना संघटित करुन त्यांचे प्रश्न मांडणाऱ्या इला बेट भर आणि भीमाशंकर खोऱ्यातील विस्थापित आदिवासींच्या प्रश्नांवर सातत्यांने त्यांनी संघर्ष चालू ठेवला होता. कुसुमताई यांच्या निधनांमुळे महाराष्ट्र आदिवासी जनांचे मातृंत्व हरपले अशा शब्दांत राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा विविध संस्थातून श्रद्धांजली वाहण्यांत आली. त्यांच्या निधनांमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.