
शोधून शोधून मारू; आता फक्त 48 तासांचा वेळ!
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेतला आहे. या दोघांमध्येही समेट घडवूण आणण्यासाठी ट्रम्प यांनी एक शांती करार समोर आणला आहे.
इस्रायलने या शांतता करारावर सहमती दर्शवली आहे. सोबतच अनेक मुस्लीम राष्ट्रांनीही या शांतता करारावर कोणताही आक्षेप नोंदवलेला नाही. असे असताना आता हमास या संघटनेच्या सहमतीसाठी ट्रम्प यांनी थेट अल्टिमेटम दिले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी आता हमासला 48 तासांचे अल्टिमेटम दिले आहे. या काळात शांतता कराराला नाकारल्यास त्याचे कठोर परिणाम भोगावे लागतील, अशी थेट धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे.
7 ऑक्टोबर रोजी महिला आणि लहान मुलांना ठार करण्यात आलं. या हल्ल्याला उत्तर म्हणून इस्रायले 25 हजारपेक्षा जास्त हमासच्या दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. उर्वरित दहशतवाद्यांना इस्रायलच्या सैन्याने घेरले आहे, असे ट्रम्प यांनी सांगितले.
तसेच इस्रायल फक्त माझ्या होकारासाठी थांबलेला आहे. उर्वरित हमासचे दहशतवादी कुठे लपलेले आहेत, ते इस्रायलला माहिती आहे. माझ्या एका इशाऱ्यावर या सर्वांनाच इस्रायल शोधून शोधून मारून टाकेन असा इशाराच आता ट्रम्प यांनी दिला आहे. त्यामुळे आता नेमके काय होणार? हमास शांतता करारावर सहमती दाखवणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.