
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा-
साध्या यंत्रमागाच्या आधुनिकीकरणासाठी राज्य योजना
योजनेचे स्वरूप
कापडाची गुणवत्ता व उत्पादनात वाढ, वीज वापरातील बचत, कमी उत्पादन खर्च व देशांतर्गत व जागतिक बाजारपेठेत स्पर्धात्मक होण्यासाठी साध्या यंत्रमागचे आधुनिकीकरण करण्यासाठी केंद्र शासनाच्या योजनांना सहाय्यक योजना म्हणून ही योजना राबविण्यात येते.
योजनेच्या अटी
◆केंद्र पुरस्कृत एसएसआय क्षेत्रासाठी प्लेन पॉवर लूमचे इन सिटू अपग्रेडेशनच्या पायलट योजनेअंतर्गत साध्या यंत्रमागांना जोडतंत्र प्रधान करण्याकरिता केंद्र शासनाकडून ज्या यंत्रमागधारकांना अर्थसहाय्य प्राप्त होईल अशा यंत्रमागधारकांना राज्य शासन अर्थसहाय्य देईल.
◆केंद्र शासनाकडून लाभार्थ्यांची माहिती प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांना अर्थसहाय्य देण्याचे धोरण राज्य शासनाकडून अवलंबिण्यात येईल.
योजनेअंतर्गत लाभ
साध्या यंत्रमागाचे सेमी ऑटोमेटिक शटललूम करणे – सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ३५ टक्के नुसार १० हजार रुपये, अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता २० टक्केनुसार ६ हजार ८०० रुपये व अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता ८ टक्केनुसार २ हजार ४०० रुपये अनुदान देण्यात येईल.
सेमी ऑटोमेटिक शटललूमचे शटललेस रॅपीअर लूम करणे – सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ३५ टक्के नुसार १७ हजार ५०० रुपये, अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता २० टक्केनुसार १० हजार रुपये व अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता ८ टक्केनुसार ४ हजार रुपये अनुदान देण्यात येईल.
साध्या यंत्रमागाचे शटललेस रॅपीअर लूम करणे- सर्वसाधारण प्रवर्गाकरिता ३५ टक्के नुसार २८ हजार रुपये, अनुसूचित जाती प्रवर्गाकरिता २० टक्के नुसार १६ हजार रुपये व अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता ८ टक्केनुसार ६ हजार ४०० रुपये अनुदान देण्यात येईल.
अधिक माहितीसाठी : संचालक (वस्त्रोद्योग) वस्त्रोद्योग संचालनालय, खोली क्रमांक ९३, पहिला मजला, जुनी सचिवालय इमारत समोर. जीपीओ सिव्हिल लाईन्स, नागपूर – ४४०००१ टेलीफोन क्रमांक ०७१२ २५६१२४७ यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा