
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- केंद्र सरकारच्या मदतीने राज्यात राबवलेल्या कल्याणकारी योजनेचा लाभ मिळू लागल्याने अनेक नागरिकांनी धन्यवाद असे पंतप्रधान मोदींना पत्र पाठवून आभार व्यक्त केलं.
केंद्र आणि राज्यांमध्ये भा.ज.पा.सरकार असल्यामुळे केंद्र सरकारच्या मदतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून हजारो कल्याणकारी योजना राबविल्या आहेत . याचा गावोगावी, खेडोपाडी, घरोघरी नागरिकांना लाभ मिळत आहे, यामुळे नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद मोदीजी म्हणून पत्र पाठवून आभार मानत आहेत, असाच असंख्य लाभधारकांनी गुरुवार दिनांक ३ नोव्हेंबर २२ रोजी एकत्रितपणे मोदींना पत्र पाठवून धन्यवाद दिले आहेत.
डिजिटल इंडिया, आयुष्यमान भारत, गरीब कल्याण योजना, स्किल इंडिया, पिक विमा योजना, स्वच्छ भारत, बेटी बचाव बेटी पढाव, आवास योजना, उज्वला योजना, जेष्ठ नागरिकांना एस टिचा मोफत प्रवास, पीएम किसान योजना अशा एक नव्हे अनेक योजना केंद्र सरकारच्या मदतीने महाराष्ट्रात नव्हे देशभरात राबवले आहेत.
कधी नव्हे ती ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के मोफत प्रवास करण्याची संधी मिळाली आहे, यामुळे ज्येष्ठ नागरिकांत समाधान व्यक्त केले जात आहे, असाच समाधान व्यक्त करणारा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद देणारा कार्यक्रम शहरात माजी मंत्री आ. राणाजगजितसिंह पाटील, मा. आ.सुजितसिंह ठाकुर जिलहाध्यक्ष नितिन काळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस विधीज्ञ कुलदीपसिंह रेवण भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.यावेळी असंख्य लाभधारकांनी धन्यवाद देणारे पत्र कार्यकर्त्या मार्फत पंतप्रधान मोदीना पाठवण्यात आले.
यावेळी भाजपचे जेष्ठ नेते बाळासाहेब क्षिरसागर, भूम ता अध्यक्ष महादेव वडेकर , तालुका सरचिटणीस संतोष सुपेकर. शहर अध्यक्ष शंकर खामकर , युवा मोर्चा ता. अध्यक्ष भाऊसाहेब कुटे , तालुका अल्पसंख्यांक अध्यक्ष महेबुब शेख , माजी नगरसेवक रोहन जाधव , चंद्रकांत गवळी , विधिज्ञ संजय शाळू , शहर कोषाध्यक्ष सचिन बारगजे उपस्थित होते.