
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे यांनी शाळाबाह्य व स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून या स्थलांतरित मुलांच्या जीवनात एक नवी पहाट आणली अशा काही निवडक बालरक्षकांच्या प्रयत्नांच्या यशोगाथा या कॉफी टेबल बुक च्या माध्यमातून मांडल्या आहेत.
तसेच शाळेतील शिक्षकांच्या मदतीने आणि समाजातील विविध घटकांच्या सहकार्याने शाळा विकासासाठी व विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांच्या यशोगाथा गुणवत्तेची बेटे शिक्षणाच्या नव्या वाटा या पुस्तकात उल्लेखनीय नोंद केली आहे.
मला या ठिकाणी सांगताना आनंद होतो की शासनाच्या या कॉफी टेबल बुक नवी पहाट व गुणवत्तेची बेटे शिक्षणाच्या नव्या वाटा या शिक्षण विभागाने निर्मिती केलेल्या दोन्हीही पुस्तकामध्ये बालरक्षक चळवळींमध्ये स्थलांतरित मुलांसाठी केलेले कार्य व आमच्या श्रीरामतांडा शाळेतील सर्व सहकारी शिक्षकांनी केलेले शैक्षणिक कार्य याची लेखाच्या रुपात नोंद घेतली आहे.
महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात प्रेरणादायी कार्य करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींच्या शैक्षणिक कार्याचा गौरव करणाऱ्या व शिक्षण विभागाने तयार केलेल्या गुणवत्तेची बेटे `शिक्षणाच्या नव्या वाटा’ व नवी पहाट हे दोन पुस्तके आदरणीय डॉ. कमलादेवी आवटे मॅडम उपसंचालक,भाषा विभाग यांच्या हस्ते बालरक्षक श्री. जगदीश कुडे सर यांना पुणे येथील राज्य कार्यालयात प्राप्त झाली आहेत.
बालरक्षक चळवळ व श्रीरामतांडा शाळेतील शैक्षणिक कार्याची दखल या शासकीय पुस्तिका मध्ये घेतल्याबद्दल आदरणीय संचालक साहेब, उपसंचालक, व पुस्तक निर्मिती मधील सर्व अधिकारी ,कर्मचारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचे श्रीरामतांडा शाळेच्या वतीने मानले आभार.