
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता मोहीम अंतर्गत वंचित चे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्या हस्ते सोनगिरी येथे शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
भूम :-तालुक्यातील सोनगिरी येथे वंचित बहुजन आघाडीच्या ग्राम शाखेचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्या शुभहस्ते करण्यात आले.गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता मोहीम अंतर्गत तालुक्यात शाखा स्थापनेची मोहीम जोरात असल्यामुळे आगामी लोकसभा,विधानसभा, जिल्हा परिषद,पंचायत समिती या ठिकाणी वंचित किंगमेकर ठरणार असल्याचे चित्र दिसत आहे.तसेच समस्त गावकऱ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका पूर्ण ताकदीने लढणार असून पंचायत समिती व जिल्हा परिषद वंचित बहुजन आघाडीचे प्रतिनिधी पाठवली शिवाय राहणार नाही असा ठाम विश्वास दिला.यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष मुसांभाई शेख,युवक जिल्हा उपाध्यक्ष वैभव गायकवाड, शहराध्यक्ष भुम रोहित गायकवाड ,छकूल सरवदे ,रत्नदीप सरवदे ,युवा नेते आक्की गायकवाड ,धीरज शिंदे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते व समस्त गावकरी उपस्थित होते.