
दैनिक चालू वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
कंधार तालुक्यातील उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा बोल्हाई प्रतिष्ठान चे सचिव आणि पत्रकार क्षेत्रातील चळवळीतील ज्येष्ठ लढवय्ये पत्रकार म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते असे गणेशभाऊ लोखंडे यांचा आज दि. ६ नोव्हेंबर रोजी वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…….
गणेशभाऊ लोखंडे यांचा जन्म परभणी जिल्ह्यातील सुपा या आजोळी गावी झाला.
गणेश लोखंडे यांना त्यांच्या वडीलांनी शिक्षणासाठी शिराढोण , पालम, नांदेड,व औरंगाबाद येथे त्यांनी शिक्षणाचे धडे घेतले. औरंगाबाद येथे एटीडी पूर्ण करून आल्या नंतर भिंती रंगवून सुंदर नाव काढीत व्यवसायात गुंतले . मानवी जीवनात सत्ता , संपत्ती ,व किर्ती याची प्राप्ती करणे हे प्रत्येक मानवांचे उदिष्ट असते.ते साध्य झाले तरी यशस्वी जीवन म्हणता येत नाही. जे व्यक्ती स्वत: चे कुटुंब सुखी करून इतरांनाही सुखी करण्याचे अविरत कार्य करून समाजमनावर खोल ठसा उमटवतात की तो ठसा काळालाही कधीच पुसुन टाकता येत नाही.त्यांचे मूर्तीमंत उदाहरण म्हणजे पत्रकारीतेतून एक प्रभावी आणि आदर्श ,मन मिळाऊ स्वभावाचे व्यक्तिमत्त्व असलेले गणेश दादा लोखंडे होत.
बोल्हाई प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून मातृस्पर्श सोहळा, श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने लहान लहान मुलांसाठी श्रीकृष्ण सजावट स्पर्धा घेऊन प्रत्येक आईला आपला बाळ हा कृष्णा दिसला पाहिजे.या मध्यमातून विविध उपक्रम घेऊन अनेकांच्या मना मध्ये घर करून बसलेल लोखंडे कुटुंब.
पेंटीगचे काम करीत करीत गणेश दादांचे मामा भाऊसाहेब सुपेकर हे नाट्यकलावंत व रंगभूषाकार म्हणून परिसरात ओळखले जाते.नाटकामध्ये कलाकारांना रंगभूषा करण्यासाठी ते माझ्यासोबत गावोगावी जायाचे ,हे करीत करीत … त्यांच्या अंगातला कलाकार जागा झाला. नाटकांमध्ये पाटलाची भूमिका निभावत नाटक गाजवून ठेवायचे…..
. कालांतराने श्री अक्षर गणेश मंडळाची स्थापना करून मित्रपरिवार तयार केला. गावातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी क्रिकेट टिम ला प्रोत्साहन दिले. आज त्यावेळचे त्यांचे खेळाडू मित्र आज गावात राजकीय, विविध सामाजिक, धार्मिक क्षेत्रात आगळेवेगळे कार्य करत आहेत. नेहमी विविध प्रकारच्या उद्बोधक कार्यक्रमांचे आयोजन करून समाज प्रबोधनाचे कार्य हाती घेतले. ते मागे न पहाता ते पुढे जाण्याचा मार्ग शोधत राहीले. एका शाळेत मानधनावर शिक्षक म्हणून नोकरी केली.पण ज्यास्त दिवस न राहता समाजाचे कार्य करण्याचे ठरवून प्रथमच दादाच्या मार्गदर्शनाखाली तरूणांना एकत्र करून एका पक्षाची स्थापना केली. त्यांनी त्यावेळी सर्व समाजातील मित्राची संघटना गावाच्या राजकारणात सक्रिय झाले.हळूहळू गणेश दादाने पत्रकारितेत प्रवेश केला.सर्वप्रथम त्यांनी दैनिक सकाळ पेपर मध्ये बातमी लिहून संबंधित अधिकारी यांना विकास कामांसाठी विधायकपत्रकारीतेचे काम करत असताना प्रसंगी अधिकारी मंडळींना धारेवर धरून लोकांचे काम करण्यास भाग पाडले….
उस्माननगर येथे मराठी पत्रकार संघाची स्थापना केली.त्यावेळेस त्यांची अध्यक्ष म्हणून निवड केली.
. या कालावधीत आपल्या परिसरात सुद्धा गावांचा चौफेर विकास व्हावा यासाठी सर्व पत्रकार सहलीला, अभ्यास दौरा म्हणून समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धी, पोपटराव पवार यांच्या हिवरेबाजार , माधवराव पाटील झरीकर यांच्या गावांना भेटी देऊन ….
त्या गावातील कामाची पारख करून घेतले.त्याच धर्तीवर उस्माननगर येथे व परिसरात कामे व्हावेत म्हणून वर्तमान पत्रात लिखाण केले….काही ठिकाणच्या गावात कामे केली.परिसरातील अनेक प्रश्न समोर आनून त्याचा छडा लावण्यासाठी प्रयत्न केले.
गणेश लोखंडे यांनी पत्रकार संघाच्या माध्यमातून सर्व सहकारी पत्रकारांना सोबत घेऊन पत्रकार सभागृह साठी उस्माननगर येथे ग्रामपंचायत कडून हक्काची जागा मिळवली. तात्काळ मागणीची पूर्तता सरपंचांनी मंजूर करून नमुना आठ पत्रकार संघाच्या नावाने दिला. तत्कालीन पंचायत समितीचे माजी सभापती बालाजी पांडागळे यांनी पत्रकार सभागृहाच्या बांधकामाची सुरुवात म्हणून एक लाख रुपये दिले .तर तत्कालीन लोहा- कंधार विधानसभा मतदारसंघाचे आमदार व सध्याचे नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सात लाख रुपये निधी उपलब्ध करून महाराष्ट्रात ग्रामीण भागातील प्रशस्त,पत्रकार बांधवांना अभिमान वाटावा असे सभागृह उभे करण्यास सहकार्य केले.
आज उस्माननगर मध्ये भव्य पत्रकार सभागृहाची इमारत उभारण्यात आली आहे.विशेष म्हणजे नांदेड येथील अखिल भारतीय पत्रकार परिषदेच्या अधिवेशनात ग्रामीण भागात सुसज्ज पत्रकार सभागृहाची इमारत उभी केली याबद्दल पत्रकार संघाच्या अभिनंदनाचा ठराव करून गौरव करण्यात आला आहे.
गणेश लोखंडे यांनी आपल्या निर्भीड लिखाणातून प्रशासनाला जागे केले आहे.व कामे करण्यासाठी भाग पाडले आहे. पत्रकार संघाचे ब्रीदवाक्य ” विकासासाठी सर्वांसोबत ” हे स्विकारून सर्व पत्रकारांची एकत्रित येऊन विधायक कार्य करण्यासाठी प्रेरित करून प्रोत्साहन निर्माण करण्याचा प्रयत्न करत राहिले पाहिजे अशी भावना स्वतः च्या आई, वडीलांना आदर्श मानणारे गणेश लोखंडे वारंवार व्यक्त करतात हे विशेष.
सामाजिक कार्यात , धार्मिक कार्यात सदा अग्रेसर राहतात . गावातील कोणत्याही कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवितात
आचार्य बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर, ना. भि, परूळेकर, आगरकर यांच्या विचारांवर, विकासात्मक,विधायक पत्रकारीतेचे काम करणारे … लोखंडे यांनी स्वता: मध्ये कधीही अहंकार बाळगलेला नाही.सर्वांच्या चांगल्या कार्यात सहभागी होणे हा त्याचा स्वभाव गुणविशेष आहे.सामाजिक व पत्रकारीता क्षेत्रात आत्मविश्वासाने काम करून ते यशस्वी झाले आहेत.त्यामुळे ते कृर्तत्वान,आष्टपैलू ,शांत मनमिळाऊ स्वभावाचे पत्रकार म्हणून सुपरिचित आहेत.यापुढेही त्यांच्याकडून शैक्षणिक, सामाजिक,व निर्भिडपणे पत्रकारीता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य घडून यशस्वी व्हावेत या अभिष्टचिंतनासोबत गणेश विश्वासराव लोखंडे साहेबांना वाढदिवसाच्या निमित्ताने निरोगी, दीर्घायुष्य प्राप्त लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना…
तसेच उस्माननगर परिसरातील पत्रकारीतेच्या चळवळीतील एकमेव जेष्ठ लढवय्ये पत्रकार असणारे गणेश लोखंडे यांचा वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
माणिक भिसे
उस्माननगर ता.कंधार