
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:
नांदेड येथे महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व सांस्कृतिक मंत्री मा. श्री.सुधीर भाऊ मूनघंटीवार आले असता त्यांना देगलूर शहरात हरित दुतर्फा पट्टा करून देगलूर शहराला सौदर्यात भर घालावी शहरातील मुख्य रस्ते चंद्रभागा पेट्रोल पंप ते तेलगांना सीमेपर्यंत, शिवाजी पार्क ते होट्टल रोड, नागसेन चौक ते भायगाव रोड असे प्रमुख रस्ते हरित दुतर्फा करून शहरातील सौदर्यात तसेस जेष्ठ नागरिकाना मोकळा श्वास मिळेल ,आणि शहरात वृक्षारोपण साठी मागणी केली,शहरातील सांस्कृतिक कार्यक्रमासाठी आंबेडकर सभागृह नूतनीकरण व अद्यावत नवीन सभागृहासाठी निधी असे निवेदन देण्यात आले यावेळी नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब ,मा. श्री .गंगाधर जोशी साहेब,यांच्या मार्गदर्शनाखाली दिगंबर कौरवार,संतोष आगलावे,किरण उल्लेवार,योगेश मैलागींरे ,सुरज मामिडवार,यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले