
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
खानापूर फाटा ते खानापूर गाव रस्ता खोदून वर्षाचा कालावधी झाला तरी कंत्राटदार व प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे कामाला विलंब होत आहे. खानापूर गाव ते देगलूर जाण्यासाठी एकमेव रस्ता असून तसेच मुखेड ला सुद्धा जाण्यासाठी हाच रस्ता प्रमुख आहे.मुखेड जाण्यासाठी मुख्य रस्ता हाच असून प्रवासी वाहतूक करणारे गाड्या नोकरदार वर्ग विद्यार्थी यांना रस्त्याचे काम खोळंबल्या मुळे त्रास सहन करावा लागत आहे. एकलार ते खानापूर फाटा येथील शेतकऱ्यांच्या संबंधित रस्त्याच्या तक्रारी न्यायालयात प्रलंबित आहेत. हे सुद्धा कारण वेळोवेळी देण्यात येत आहे. नागरिकाचे होणारी गैरसोय लक्षात घेऊन लवकरात लवकर काम चालू करावे.
संबंधित रस्त्याचे लवकरात लवकर दुरुस्ती करावी अन्यथा मोठे जण आंदोलन उभारण्यात येईल अशा इशारा श्री अनंत हनमंतराव पाटील, शिवकुमार नारायणराव ताडकोले, राजेश्वर पाटील आटकळे, मारोतराव परबते, संतोष पाटील कदम व समस्त गावकरी मंडळी खानापूरच्या वतीने मनोदय व्यक्त केला आहे.