
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
चंद्रपूर
गुरुनानक जयंती उत्सव निमित्त समाज बांधवांच्या वतीने शहरातुन काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे गांधी चौक येथे आमदार किशोर जोरगेवार यांनी आज स्वागत केले. या वेळी शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. यंग चांदा ब्रिगेडचे युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, राशिद हुसेन, सलिम शेख, सतनाम सिंह मिरधा, तापुष डे, सविता दंडारे, भाग्यश्री हांडे, राम जंगम, प्रतिक शिवणकर, विनोद अनंतवार, दिनेश इंगळे, किशोर बोलमवार, बंडी कारिया आदींची या वेळी उपस्थिती होती.
येत्या ८ नोव्हेंबरला गुरुनानक देवजी यांची जयंती साजरी होत आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदाही समाज बांधवांच्या वतीने गुरुनानक देवजी यांचा जयंती उत्सव साजरा केल्या जात आहे. त्या निमित्त आज शनिवारला अंचलेश्वर गेट जवळील गुरुद्वारा गुरुसिंग सभा येथुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सदरहु शोभायात्रेचे स्वागत करण्यासाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने गांधी चौक येथे मंच उभारण्यात आला होता. ही शोभायात्रा मंचाजवळ पोहचताच मंचावर उपस्थित आमदार जोरगेवार यांनी शोभायात्रेचे स्वागत केले. या प्रसंगी येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने शोभायात्रेत सहभागी समाज बांधवांसाठी शितपेयाची व्यवस्था करण्यात आली होती. शोभायात्रा पोहचताच सहभागी समाज बांधवांना शितपेयाचे वाटप करण्यात आले.