दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:बिलोली तालुक्यातील रूद्रापूर येथे आज जिल्हा परिषद प्राथमिक रुद्रापूर येथे मिशन आपुलकी अंतर्गत कै. चंद्रकांतराव मारुती जमदडे यांचे प्रथम पुण्यस्मरण त्यांचे कुटुंबीय ,कामाबाई जमदडेश्री कमलाकर जमदडे,अर्चना जमदडे, विषम्बर जमदडे,प्रियंका जमदडे ऋतुजा जमदडे,,क्षितीजा जमदडे,सात्विक जमदडे यांच्या पुढाकाराने शाळेतील प्रत्येक वर्गखोलीत एक घड्याळ भेट देऊन समाजाभिमुख प्रथम पुण्यस्मरण साजरे केले.*
गावाकडील शाळेत साहित्य वाटप करून आपल्या वडिलांचे पुण्यस्मरण शाळेतील चिमुकल्यांना कालगणना, वेळेचे महत्व पटावे म्हणून श्री कमलाकर जमदडे(राज्य सदस्य बुवा बाजी संघर्ष विभाग अंनिस नांदेड तथा संपादक लोकसेवा live news) यांनी समाजाप्रती उदात भावना कर्तृत्वाने व्यक्त केले यावेळी मोहन जमदडे, संजय बुडावाड, नागनाथ नारलावाड, सामाजिक कार्यकर्ते मिथुन सोलंकी, राजेश इंद्राक्ष, विठ्ठल पा. रुद्राक्ष, लक्ष्मण जमदडे, वैभव जमदडे,हावगिर जमदडे,सतिश नारलावाड, गावातील प्रतिष्ठित नागरिक व सामाजिक कार्यकर्ते शाळेचे मु अ श्री इप्पर सर व श्री मिथुन सर यांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले, श्री बरबडे सर यांनी सूत्रसंचलन केले .सौ गोंड मॅडम व सर्व शिक्षक सर्व विध्यार्थी यांची उपस्थिती होती
