दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-वाशिम येथून महाराष्ट्रात आगमन झालेल्या पातूर मार्गे शेगाव प्रस्थान पदयात्रेदरम्यान काँग्रेस नेते राहुलजी गांधी यांच्या सभेला जनसागर उसळनार आहे.महागाई,बेरोजगारी व जीएसटी अश्या महत्त्वपूर्ण मुद्द्यातून सामान्य जनतेची सरकारने केलेली आर्थिक फसवणूक यासाठी काँग्रेस कमिटी अमरावती जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख हे काँग्रेस नेते तथा खासदार राहुलजी गांधी यांच्या सोबत पातूर येथील पदयात्रेदरम्यान चर्चा केली.यावेळी हजारो कार्यकर्त्यांसह सामान्य जनतेची एकच झुंबड पातूर येथील पदयात्रेत पाहायला मिळाली.जनता महागाईमुळे त्रासलेली असल्यामुळे येत्या लोकसभा,राज्यसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस समोर राहणार असल्याचा दावा अमरावती जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला.
काँग्रेस नेते राहुलजी गांधी हे गेल्या दोन महिन्यांपासून निरंतर पायदळ चालत असल्याकारणाने भाजप सरकारची झोप उडाली आहे.शेगाव येथील सभेकरिता अमरावती जिल्ह्याच्या काँग्रेस कमिटीची पूर्वतयारी झालेली असून अमरावती काँग्रेस कमिटी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्यासह हजारो कार्यकर्ते पातूर येथील पदयात्रेत सहभागी झाले आहेत.या पदयात्रेदरम्यान जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सामान्य जनता महागाईमुळे त्रासलेली असल्यामुळे भाजपा सरकारने नागरिकांना दिलेल्या वेगवेगळ्या आमिषाला बळी पडून फसवणूक केली आहे आणि येत्या लोकसभा,विधानसभा, महानगरपालिका,नगरपालिका,जिल्हापरिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येणार असल्याचेही काँग्रेस नेते तथा खासदार राहुलजी गांधी यांच्या सोबत चर्चा करतांना म्हटले आहे.तसेच नागरिकांचा सरकार विरुद्ध रोष असल्यामुळे शेगाव येथील सभेत हजारो कार्यकर्त्यांसह जनता आपल्या समस्या घेऊन पदयात्रेमध्ये सामील होत आहे.शेगाव येथील सभेची पूर्वतयारी झालेली असून या सभेला एकाच वेळी ५० हजार नागरिक बसतील अशी सुविधा करण्यात आली आहे.
