दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- क्रांतिसूर्य महामानव बिरसा मुंडा यांच्या १४७ व्या जयंती निमित्त दि.१५/११/२०२२ रोजी खोडगांव(अल्लिपुर) ता.अंजनगाव सुर्जी येथे आदिवासी समाजाने जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.कार्यक्रमाची सुरवात
भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला हारार्पण करून पुजन करण्यात आले.तसेच यावेळी प्रमुख पाहुणे लाभलेले सामाजिक कार्यकर्ते तथा माजी सभापती यांनी म्हटले की,बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील उलिहातू या गावी १५ नोव्हेंबर,१८७५ रोजी झाला.त्यांचे शिक्षण जर्मन मिशननरी स्कूल मध्ये झाले.सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा बिरसाचा स्वभाव होता.त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवयस्क आणि समविचारी सहकार्यांचे संघटन केले.बिरसांना आपल्या वडिलांचे सुगन मुंडांचे जबरदस्तीने धर्मांतर केल्याबद्दल ख्रिस्ती मिशनऱ्यांचा व इंग्रजांचा मनस्वी राग येत असे.त्यातच अशिक्षित आदिवासींवर इंग्रजांकडून होणारा अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याचा विचार त्यांनी केला.बिरसा मुंडांनी गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले होते.त्यांच्या आशीर्वादाने आणि त्यांच्या सहकार्या ने इंग्रज सरकारच्या अन्यायाविरोधात बिरसा मुंडाने छोटा नागपूर क्षेत्रात इ.स १८९५ साली लढा उभारला.इंग्रजांनी त्याला अटक केली व तुरुंगात अतोनात छळ केला.९ जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची कारागृहात मृत्यू झाला.बिरसा मुंडा यांना लोकांनी जननायक हा किताब बहाल केला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित मा.शंकरदादा मालठाणे तसेच त्यांच्या पत्नी सौ.प्रियंकाताई मालठाणे (महीला जिल्हाध्यक्ष) हे अमरावती जिल्ह्यात अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवितात.त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.तसेच गावातील आदिवासी समाजाला काही योजनेची लाभ मिळत नाही.जात प्रमाणपत्र, बिपीएल,घरकुल,जागेचे पट्टे,नदी लगत असलेल्या घरांना संरक्षण भिंत,नदीच्या येणाऱ्या पुरामुळे ये-जा करण्यासाठी रस्ता अश्या गावातील समस्यामुळे काही मागण्या घेऊन आमरण उपोषणाला दि.१६/१०/२०२० ला तीन दिवस अन्नत्याग उपोषणाला फुलवंतीबाई मरस्कुले,शांताबाई ठाकरे,संगीता उईके ह्या महीला बसल्या होत्या
त्याबद्दल त्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमावेळी गावातील सरपंच सौ.प्रचीताताई नेमाडे,प्रतीभाताई जामुनकर,फुलवंतीबाई मरस्कुले,कमलाबाई पाटनकर,सारीकाबाई कास्देकर,करन मरस्कुले,मुन्ना मरस्कुले,पंजाबराव पाटनकर,हिरामण ठाकरे,नंदु हरसुले,चंदरजी गायन,निवृत्ती तुरखडे,पवन प्रजापती,अनंता हरने,सचिन हरणे,अंकुश जवंजाळ,प्रतीक जवंजाळ,परसुराम वट्टी,सुनील ईडपाचे,करण कास्देकर तसेच गावातील आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
