दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
नांदेड :- नांदेड जिल्ह्यातील सर्व मतीमंद व दिव्यांग लाभार्थ्यांना शासनातर्फे मोफत धान्य पुरवठा दर महिन्याला करण्यात यावे तसेच शासनाकडून मिळणारे मानधन दर महिन्याला वाटप करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.मोफत धान्य दुकानदार देत नाहीत पैसे घेऊन धान्य वाटप केले जाते आहे.तसेच शासन त्यांना मानधन चार ते पाच महिने उशिराने देत आहेत.त्यांनी जगायचं कसं शासनाला व स्वस्त धान्य दुकानदारांना फक्त मतीमंद व दिव्यांग लाभार्थ्यांना त्रास करून घेऊन काय मिळणार आहे.गरीब मुक्या लुळ्यापांगळ्याकडे लक्ष देवून त्यांना मिळणारे धान्य व मानधन दर महिन्याला कसे वाटप करण्यात येईल याची जिल्हाधिकारी साहेबांनी व्यवस्था करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री.व्यंकटी जाधव व श्री.पांडूरंग कंधारे यांनी मागणी केली आहे.अन्यथा आम्हाला नाईलाजास्तव आमरण उपोषणाला बसावे लागेल असे आवाहन त्यांनी केले आहे.
