दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी धुळे- संभाजी गोसावी
जिल्हा पोलीस दलामध्ये पोलीस प्रशिक्षण केंद्रात एका पोलीस निरीक्षकांने आपली जीवन यात्रा संपवली. या घटनेमुळे धुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली. प्रवीण कदम असे या पोलीस निरीक्षकांचे नाव असून तीन वर्षापासून धुळ्यात नियुक्त होते. त्यांनी प्रशिक्षण केंद्रातील शासकीय निवासांत गळफास घेवुन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी कदम यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती.की माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरु नये असे कदम यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेतली पुढील तपास पोलीस करीत आहेत. दरम्यान पोलीस अधिकारी प्रवीण कदम यांनी आत्महत्या का केली हे मात्र अद्याप अजूनही स्पष्ट झाले नाही तपासअंतीच कदम यांच्या आत्महत्येचे नेमकं कारण स्पष्ट होईल. प्रवीण कदम हे मूळचे जळगांव जिल्ह्यांतील तळेगाव या गावचे रहिवासी होते. प्रवीण यांचे वडील भुसावळ येथे व्हिडिओ मेकॅनिकल म्हणून कार्यरत होते. १९९१ साली ते महाराष्ट्र पोलीस दलामध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून भरती झाले होते. पोलीस विभागांमध्ये सेवा करत असतानाच २००३ साली ते पास होऊन पीएसआय झाले होते.तीन वर्षांपूर्वी त्यांना पोलीस निरीक्षक पदी बढती मिळाली होती. प्रवीण कदम यांचे संपूर्ण कुटुंब नाशिक येथे स्थायिक झाले होते. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आई,वडील पत्नी असा त्यांचा परिवार होता.पोलीस विभागांत काम करणाऱ्या प्रवीण कदम यांना वाद्य वाजवण्याची प्रचंड आवड होती त्यांच्या आत्महत्या मुळे संपूर्ण धुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उडाली.
