दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
विद्या विकास विद्यालय, सरस्वती विद्यालय-ग्रंथालय, पोलीस स्टेशन चौकी, वि.वि.उच्च माध्यमिक विद्यालय, हाणमंतमामा वाडीकर मित्र मंडळ, बळवंत पाटील यांचे तेजस हार्डवेअर, पत्रकार बांधवांना बाऱ्हाळी येथे येथे महापुरुषांच्या जयंतीनिमित्त सरफराज अहमद सर लिखित “असा होता टिपू सुलतान” ही पुस्तक भेट देण्यात आली. अशी जयंती साजरी करण्याची कल्पना व आयोजन शेख शाहरुख पैसमाळकर यांची होती. यावेळी सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष शिवशंकर पा.कलंबरकर, तालुका पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष रियाज शेख, पत्रकार मुस्तफा पिंजारी बेटमोगरेकर, शेख जिशान बाऱ्हाळीकर, विद्या विकास मा.व उच्च विद्यालयाचे शिक्षक, सरस्वती विद्यालयाचे शिक्षक,बाऱ्हाळी येथील मित्र मंडळी, पत्रकार बांधव, सहकारी मित्र उपस्थित होते.
———————————–
