दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कलंबर:- मराठवाड्यातील थोर संत योगीराज श्री संत निवृत्ती महाराज,ब्रम्हीभूत श्री संत मोतीराम महाराज यांचे शिष्य मंडळी नांदेड,लातुर,परभणी या जिल्ह्यामध्ये खुप प्रमाणात आहेत.परभणी जिल्ह्यातील श्री संत निवृत्ती महाराज श्री संत पेंडू व श्री संत मोतीराम महाराज श्री क्षेत्र फळा येथे महाराजांची समाधी स्थळे आहेत.या दोन्ही संतांच्या जीवन चरित्रावर १९८० ते ९२ बारावर्ष महाराजांची प्राथमिक माहिती घेण्यासाठी ग्रंथकार बस ने वेळ प्रसंगी त्या त्या भागात पायी फिरून माहीती संकलित केली.कंधार/रोहा तालुक्याचे भूमीपूत्र वै.ह.भ.प.शंकर महाराज घोरबांड ह.मु.कलंबर(खु.)ता.लोहा जि.नांदेड येथील महाराजांनी सुंदर ओवीबद्ध ग्रंथाचे लेखन केले.त्यानंतर तो ग्रंथ २००२ मध्ये प्रकाशित करण्यात आला.त्यावेळी ह.भ.प. मामासाहेब मारतळेकर, डॉ.गोविंद नांदेडे,ह.भ.प.रेशमाजी महाराज गुंडेवाडीकर,जागदेराव बसवदे गुरूजी यांच्या उपस्थितीत ग्रंथाचे प्रकाशन सोहळा भव्य-दिव्य स्वरूपात कलंबर(खु.) येथे संपन्न झाला.
वै.ह.भ.प.शंकर महाराज घोरबांड यांचे नातू सुरेश सुधाकरराव घोरबांड(गुरूजी) हे त्यांचा सांस्कृतिक व अद्दात्मीक वारसा पुढे सुरू ठेवत आहेत.हाच धागा धरून २६ आॅगस्ट २०१९ रोजी ह.भ.प.श्री मन्ना महाराज,ह.भ.प.अच्युत महाराज दस्तापुरकर ,ह.भ.प.श्री माऊली महाराज मुणगेकर,ह.भ.प.निवृत्ती महाराज गंगाखेडकर,ह.भ.प.बापूराव महाराज सोनखेडकर,ह.भ.प.संभाजी महाराज यांच्या मोतीराम महाराज संस्थान असे ट्रस्ट निर्माण केले आहे.आज मंदिर बांधकाम पुर्णत्वास जात आहे आणि या धार्मिक सोहळा ह.भ.प. बापुसाहेब महाराज मोरे देहूकर,ह.भ.प.श्री मन्ना महाराज कोलंबीकर, श्रीगुरु गैबीनागेंद्र महाराज,ह.भ.प.एकनाथ महाराज उमरजकर, यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.या धर्म कार्यास सर्व सदस्यांनी तन,मन,धन या रूपाने साह्य करावे व उपस्थित राहावे अशी विश्वस्त मंडळ व समस्त गावकरी मंडळी कलंबर(खु.) यांनी केली आहे.
