दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी- माधव गोटमवाड
कंधार तालुक्यातील दहा सेवा सहकारी सोसायटीच्या प्रशासकीय मंडळावर आमदार शामसुंदर शिंदे समर्थकांच्या नियुक्त्या
कंधार तालुक्यातील नियमित नियत मान कालावधी संपलेल्या व निवडणूका न झालेल्या कंधार तालुक्यातील दहा गावच्या सेवा सहकारी सोसायटीच्या प्रशासकीय मंडळावर नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आपले वजन वापरून कंधार तालुक्यातील काटकळंबा, औराळ, लाडका, शेकापूर, नंदनवन, उंमरज, घोडज, गोगदरी, बाचोटी, मानसपुरी या गावच्या सेवा सहकारी सोसायटीवर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मर्जीतील कार्यकर्त्यांच्या काही दिवसापूर्वी नेमणुका झाल्या होत्या, पण लोहा कंधार मतदार संघाचे शेतकरी कामगार पक्षाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी मंत्रालय स्तरावर आपले कायम वजन वापरून खासदार चिखलीकर समर्थकांच्या सेवा सहकारी सोसायटीवर झालेल्या नेमणुका रद्द करून वरील दहा ही गावात लोहा कंधार मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांच्या समर्थकांच्या नेमणुका सेवा सहकारी सोसायटीच्या प्रशासकीय मंडळावर झाल्या असल्याने लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्याम सुंदर शिंदे यांनी या नेमणुका रद्द करून नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना शह दिला आहे, वेळोवेळी आमदार शिंदे यांनी लोहा कंधार मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालय स्तरावर आपले वजन कायम राखले आहे ,आ. श्यामसुंदर शिंदे यांचे मंत्रालय स्तरावर वजन व शब्द कायम राहिल्याने लोहा कंधार मतदार संघातील जनतेच्या वतीने आनंद व्यक्त केला जात आहे ,आमदार शामसुंदर शिंदे हे माजी जिल्हाधिकारी, राज्याचे विविध विभागाचे कमिशनर होते, त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रामाणिक व वजनदारपणे व गोरगरिबांना न्याय देण्याचे काम आमदार शिंदे यांनी केलेले आहे, , पण प्रशासकीय सेवेतून आमदार शिंदे हे सेवा निवृत्तीनंतर आमदार झाल्यानंतरही मुंबई मंत्रालयात आमदार शामसुंदर शिंदे यांच्या शब्दाला कायम मान व सन्मान दिला गेला असल्याचे खासदार चिखलीकर यांच्या सेवा सहकारी सोसायटी वरील नेमणूका रद्द केल्याच्या कारणावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, या अगोदरही कोट्यावधी रुपयाची विकास कामे लोहा कंधार मतदार संघात यशस्वीपणे खेचून आणण्यात मंत्रालय स्तरावर आमदार शिंदे यांना वेळोवेळी यश आले होते, कंधार तालुक्यातील लाडका सेवा सहकारी सोसायटीवर प्रशासकीय मंडळ चेअरमन पदी हनुमंतराव नागोराव शिंदे, काटकळंबा- माधवराव गणपतराव पाटील पानपट्टे, उमरज- परसराम माधवराव तोरणे, घोडज- नागोराव गोविंदराव लाडेकर, मानसपुरी- दिगंबर संभाजी किडे, गोगदरी- चपत्ती नरबा कल्याणकर, नंदनवन- प्रदीप भगवानराव हुंबाड, औराळ- श्याम दिगंबर पवळे, शेकापूर- पुंडलिक राजाराम डफडे, बाचोटी- तुळशीराम जयसिंगराव शिखरे, या दहा गावच्या प्रशासकीय मंडळावर चेअरमन, व्हाईस चेअरमन व सदस्य पदी लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष, कार्यसम्राट आमदार शामसुंदर शिंदे यांच्या समर्थकांच्या नियुक्त्या झाल्याने मतदारसंघातील जनतेत आनंद व्यक्त केल्या जात असून कर्तव्यदक्ष आमदार शामसुंदर शिंदे यांचे वरिष्ठ पातळीवर मंत्रालय स्तरावर आजही वजन व त्यांच्या शब्दाला सन्मानाने मान व न्याय असल्याचे पुनश्चा सिद्ध झाले असल्याने लोहा कंधार मतदार संघातील जनतेच्या वतीने आमदार शामसुंदर शिंदे यांचे अभिनंदन व कौतुक होत असुन नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी वरील दहा गावच्या सेवा सहकारी सोसायटीच्या प्रशासकीय मंडळाच्या नेमणूक केल्या होत्या तरीही लोहा कंधार मतदारसंघाचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी आपले मंत्रालय स्तरावरील कायम वजन वापरून खासदार चिखलीकर यांनी सेवा सहकारी सोसायटीच्या प्रशासकीय मंडळावर केलेल्या नेमणुका रद्द करून दहाही गावच्या सेवा सहकारी सोसायटीच्या प्रशासकीय मंडळावर आमदार शिंदे यांचे कट्टर समर्थकांच्या चेअरमन व्हाईस चेअरमन सदस्य पदी नेमणुका केल्याने लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना हा मोठा धक्का दिल्याचे मतदार संघातील जनतेतून मानल्या जात असल्याने आमदार शामसुंदर शिंदे यांनी नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांना वेळोवेळी… हम आपसे १०० कदम आगे है… असल्याची भूमिका निभावली असल्याची मतदारसंघातील जनतेत जोरदार चर्चा आहे.
