दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मुंबई- संभाजी गोसावी
बॉलिवूडचा मिस्टर अभिनेता आमिर खान यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा लेकीने गपचूप उरकला. या साखरपुड्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल आमिर खान यांची लेक आयरा खान हिचा साखरपुडा नुकताच पार पडला आहे.बॉयफ्रेंड नुपूर शिखरे सोबत आयरांचा साखरपुडा झाला असून. लवकरच दोघे विवाह बंधनात देखील अडकणार आहेत मुंबईत पार पडलेल्या एका खाजगी सोहळ्यात जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थिंतीमध्ये हा साखरपुडा समारंभ झाला. आता या सोहळ्यांतील काही फोटो आयरा खान ने सोशल मीडियावरती व्हायरल केले. नुपूर शिखरे आणि आयरा खान हे गेले अनेक वर्षापासून एकमेकांना डेट करीत होते. काहीच दिवसापूर्वी नुपूर शिखरेने अतिशय रोमँटिक पद्धतीने आयरा खानाला प्रपोज देखील केले होते.आता या दोघांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत होता. त्यानंतर आता या लगेच दोघांनी साखरपुडा करण्यांचा निर्णय घेतला. एका खाजगी कौटुंबिक सोहळ्यांत दोघांचा साखरपुडा पार पडला आहे. या सोहळ्यासांठी आमिर खान रीना दत्तासह काही कलाकारांनी आणि जवळच्या नातेवाईकांनी हजेरी लावली होती. यासह दिग्गज कलाकारांची चांगलीच उपस्थिती होती.
