दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
18/11/2022 रोजी सायन्स काॅलेज नांदेड येथे झालेल्या 30व्या जिल्हास्तरीय राष्टिय बाल विज्ञान परिषदेत महात्मा गांधी वि.चांडोळा शाळेच्या 1)कु.नंदिनी सखाराम पाटील,कु.रुतुजा धोंडीबा धुंपटवाड कु.दिपाली सुर्यवंशी यांनी “चांडोळा परिसरातील दुर्लक्षित रानभाज्यांचा आयुर्वेदिक उपयोग व पाककृती” 2)कु.महादेवी सखाराम पाटील,कु.वर्षा व्यंकटराव वाघमारे,कु.श्रेया आनंदराव सिंगनवाड यांनी सादर केलेला”पळस एक चमत्कारी संत वृक्ष” या प्रकल्पाचा 30व्या राज्यस्तरीय राष्टिय बाल विज्ञान परिषदेसाठी निवड झाली.यांना विज्ञान शिक्षक श्री स्वामी एन.एस व श्री गेंदेवाड व्हि.जी. यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांच्या या यशाचे शाळेचे मु.अ.श्री मुंगडे यु.ए.व सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच पालकांनी अभिनंदन केले.
