दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प चंद्रपूर चे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्री.मुरूगनाथम एम (भा.प्र.से) यांची राजुरा विधानसभा क्षेत्रातील तसेच चंद्रपूर येथिल समाज बांधवांनी सदिच्छा भेट घेतली.
जिवती तालुक्यातील पाटण येथे राजीव गांधी महाविद्यालयाच्या प्रांगणात औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीचे राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आदर्श सरपंच श्री.भास्करराव पेरे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक,आशासेविका, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील,शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
मेळाव्याचे उद्घाटक सहा.जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी श्री. मुरूंगनाथम एम.असल्याने त्यांना निमंत्रण पत्रिका देणे व नव्यानेच रूजू झाल्याने सदिच्छा भेट घेण्यासाठी समाजबांधवांच्या शिष्टमंडळाने सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी मेळावा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे मान्य केले.
समाजबांधवांच्या शिष्टमंडळात गोंडवाना शिक्षण मंडळाचे अध्यक्ष तथा गोंडवाना गणतंत्र पार्टीचे युवा नेते गजानन पाटील जुमनाके, गोंगपा प्रदेश कार्याध्यक्ष तथा चंद्रपूर पं.स.माजी उपसभापती मनोजदादा आत्राम, गोंडवाना शिक्षण संस्थेचे सचिव तथा माजी जिल्हाध्यक्ष बापुराव मडावी, जिवती तालुका अध्यक्ष हनुमंत कुमरे, आदिवासी विद्यार्थी संघाचे जिल्हाध्यक्ष कंटू कोटनाके,राजे संजिव आत्राम, दशरथ कोवे, नानाजी पाटील उदे उपस्थित होते.
