दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा नगर परिषदेच्या सभागृहात आज दि.१८ नोव्हेंबर रोजी २०२२ रोजी लोहा नगर परिषदेचा ३५ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज मुर्तीस व लोहा न.पा. चे प्रथम नगराध्यक्ष कै.माणिकराव पाटील पवार यांच्या प्रतिमेस लोहा न.पा. चे लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी उपाध्यक्ष दत्ता वाले, मुख्याधिकारी गंगाधर पेंटे, जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले, गटनेते करीम शेख, माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, नगरसेवक संदीप दमकोंडवार, केतन खिल्लारे, नबीसाब शेख,नगरसेवक अमोल व्यवहारे , संभाजी पाटील चव्हाण, जीवन चव्हाण, भास्कर पवार, लोहयाचे प्रथम नगराध्यक्ष कै. माणिकराव पाटील पवार यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार, कार्यालयीन अधीक्षक उल्हास राठोड, यांच्या सह सर्व कर्मचारी , शहरातील नागरिक, पत्रकार बांधव, आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी म्हणाले की , राज्य शासनाने एक परिपत्रक काढून नगरपालिकेने वर्धापन दिन साजरा करण्याचे आदेश पारित केलेत.
लोहा व विठ्ठलवाडी हे दोन्ही गावे एक होऊन येथे नगर परिषद झाली पाहिजे विकास झाला पाहिजे म्हणून तात्कालीन आ. भाई केशवराव धोंडगे, प्रथम नगराध्यक्ष कै. माणिकराव पाटील पवार, माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी यांनी प्रयत्न केले व राज्याचे तत्कालीन लाडके मुख्यमंत्री कै. शंकरराव चव्हाण यांनी लोहा नगर परिषदेला मंजूरी दिली व लोहा नगर परिषद अस्तित्वात आली. कै. शंकरराव चव्हाण यांचे लोहा शहरावर फार प्रेम होते त्यांची लोकसभेची शेवटची सभा लोहा येथे होत होती.
कै. माणिकराव पाटील पवार व कल्याण सावकार सुर्यवंशी फार एकादिलाने राहत होते ते एका कुटुंबातील असल्यासारखे होते .
लोहा शहराच्या विकासासाठी आमचे नेते खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी आणला अनेक विकासकामे केलीत .

लोहा शहरातील नागरिकांना कायम स्वरुपी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी आमचे नेते खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या माध्यमातून शासन स्तरावर लिंबोटी धरणातून पाणी आणण्यासाठी ७५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन स्तरावर असुन ते लवकरच मंजूर होईल . तसेच लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळा लवकरच बसविण्यात येईल स्मारकाच्या चबुतऱ्याचे काम चालू आहे. लोहा न.पा. च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या खरेदीसाठी दोन वेळा टेंडर काढले होते पण दोनच टेंडर आले होते तीन टेंडर आले नसल्यामुळे ते रिकाॅल करावे लागले व ते पुन्हा काढून लवकरच छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा बसविण्यात येईल तसेच मुस्लिम शादीखाना, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ही स्मारक करण्यात येईल तसेच लोहा शहरातील राहिलेले सर्व वार्डातील विकास कामे करण्यात येतील तसेच लोहा न.पा.च्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त शहरात विविध उपक्रम राबविण्यात येतील असे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी म्हणाले.
तसेच यावेळी जेष्ठ नगरसेवक बबनराव निर्मले यांनी लोहा न.पा. स्थापन झाली तेव्हापासून झालेल्या विकास कामाबद्दल सविस्तर माहिती सांगितली.
तसेच लोहा न.पा.चे प्रथम नगराध्यक्ष कै.माणिकराव पाटील पवार यांचे नातू सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार यांनी लोहा न.पा. सभागृहाला प्रथम नगराध्यक्ष कै. माणिकराव पाटील पवार यांचे नाव दिल्याबद्दल लोहा न.पा.चे नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी व सर्व सन्माननीय सभागृहाचे आभार मानले तसेच लोहा शहरातील विविध विकासकामाबदल समाधान व्यक्त केले. तसेच लोहा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा लवकर नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी यांच्या कार्यकाळात बसवावा अशी मागणी केली व विद्यमान नगराध्यक्ष गजानन सुर्यवंशी हे पुन्हा नगराध्यक्ष व्हावे असे सुधाकर पाटील पवार म्हणाले.
तसेच जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे म्हणाले की, आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष असल्यामुळे केंद्र सरकारने १५ आॅगस्ट स्वतंत्रदिनी हर घर तिरंगा अभियान राबविले तसेच लोहा न.पा.च्या वतीने दि. २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त हर घर संविधान वाचन अभियान राबवावे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या आपल्या देशाला दिशाला दिलेल्या संविधानाची जनजागृती करण्यासाठी संविधान प्रस्ताविकेचे वाटप करावे अशी मागणी जेष्ठ पत्रकार सुरेश जोंधळे यांनी केली.
यावेळी कार्यक्रमाला मोठ्या संख्येने शहरवासीय उपस्थित होते.
