दैनिक चालू वार्ता जव्हार प्रतिनिधी -दिपक काकरा.
जव्हार:- भारत सरकारच्या विज्ञान-तंत्रज्ञान विभागामार्फत घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत राज्यस्तरावर जव्हार तालुक्यातील ग्रामीण भागातील श्री जयेश्वर विद्यामंदिर डेंगाचीमेट हायस्कूलची निवड झाली असून या शाळेतील विद्यार्थ्यांनी आरोग्य आणि कल्याणकारी परिसंस्था जाणून घेणे या विषयाअंतर्गत व आरोग्य पोषण कल्याण वाढविणे.या उपविषयानुसार तसेच पौष्टिक पिकाचा अन्नधान्यतून अभ्यास या शीर्षकाखाली नाचणी पीक या विषयावर जिल्हास्तराहस्तरीय झालेल्या ऑनलाईन स्पर्धेत बाजी मारून त्यांची राज्यस्तरावर होणाऱ्या स्पर्धेत निवड झाली आहे.राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत या विद्यार्थ्यांनी निवडलेला नाचणी पिकाची उपयुक्तता हा विषय अतिशय महत्त्वाचा असून नाचणी पिकाचे संवर्धन व्हावे या उद्देशाने या विषयाची निवड विद्यार्थ्यांनी केली होती.
शाळेतील इयत्ता आठवी,नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचा गट तयार करून या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी ६० नाचणी पीक धारक शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती व भेटी घेऊन नाचणीची पोषणमूल्ये अभ्यासली.हळवी,निमगरवी व गरवी अशा नाचणी पिकाच्या तीन जातींचा अभ्यास करून जिल्हास्तरावर राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेत सहभागी झाले होते.या जिल्हास्तरावरील स्पर्धेत नाचणी पिकाची उपुक्तता आणि आरोग्याला असणारे महत्व सांगितले होते.या विद्यार्थ्यांची पुढे राज्यस्तरीय निवड होऊन ते या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.स्पर्धेसाठी या ग्रामीण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बायक मित्र या संस्थेचे संजय पाटील व शाळेच्या शिक्षिका सुप्रिया वागळे यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यार्थ्यांनी नाचणी पिकाची व त्याची पौष्टिकचा कशा पद्धतीने व किती असते याची जाणीव करून दिली.
