दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर येथे भारतीय जनता पार्टीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांचा महिला मेळावा सिद्धेश्वर मंगल कार्यालय मध्ये घेण्यात आला होता मागील सरकारमध्ये महिलांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जायचे, पण सध्याचे शिंदे फडणवीस सरकार महिलांच्या बाबतीत अधिक संवेदनशील असल्याचे मत व्यक्त करून भाजपाच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी निश्चितच विद्यमान सरकारकडून महिलांच्या अपेक्षा वाढल्याची कबुली देगलूर येथे दिली.
येथील सिद्धेश्वर मंगल कार्यालयात भाजपाच्या महिला मंडळाचा मेळावा शुक्रवारी (ता. १८) घेण्यात आला. त्यावेळी बाघ यांनी महिलांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर माजी आमदार सुभाष साबणे, जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, गंगाधर जोशी, प्रवीण साले, श्रावण पाटील भिलवंडे, लक्ष्मण ठक्करवाड, महिला जिल्हाध्यक्षा चित्रलेखा गोरे, प्रणिता देवरे चिखलीकर, प्रकाश पाटील बेबरेकर, शिवराज पाटील माळेगावकर, सभापती अनिकेत पाटील राजूरकर, बबन पाटील गोजेगावकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
वाघ म्हणाल्या की, मागील काळात महिलावर अत्याचार करणाऱ्यांना पाठीशी घातले जायचे, त्याचे प्रसाद प्रशासनातही उमटू लागले. अधिकाऱ्यांकडूनही महिला अत्याचारांच्या घटना घडत असताना त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे
सोडून त्यांना पदोन्नती दिली जायची. मात्र त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे धाडस राज्यकत्यांना दाखवता आले नाही. सध्याच्या सरकारने याबाबतीत मोठी पाचली उचलली आहेत. त्यामुळे राज्यातील महिला भयमुक्त आपले कर्तव्य निभावत असल्याचा दाखलाही त्यांनी उदाहरणासह दिला.
प्रास्ताविक जिल्हाध्यक्षा गोरे यांनी केले. सूत्रसंचालन सुरेश पाटील ठाणेकर, राजेश्वर हांडे यांनी केले. यावेळी तालुकाअध्यक्ष शिवाजीमामा कनकंटे, अश्विनी पाटील गोजेगावकर, अशोक गंदपवार, गटनेते प्रशांत दासरवार, दिगंबर कौरवार, संतोष पाटील गोजेगावकर, नामदेव पाटील थडके आदींची उपस्थिती होती.
