दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- ता.अहमदपूर जि. लातूर येथील नगर परिषद अहमदपूर अंतर्गत असलेल्या मरशिवणी तांडा १ व २ सदर दोन्ही गावातील लोकांसाठी शासकीय विकास कामे कोणत्याही स्वरूपाचे आज तागायत झालेले नाहीत व मूलभूत गरजेपासून वंचित आहे म्हणू न सदर कामे, पिण्याच्या पाण्याची सोय,साच्यालाय, नाली, तांडा १ व २ गावाअंतर्गत रोड, रोड वरील लाईट, पोल/फोकस, समशान भूमी व प्रधानमंत्री आवास योजना(घरकुल), घराची नोंद करून नमुना८-अ इत्यादी करून मिळणे अत्यंत गरजेचे असून त्यावर शासन निर्णय घेत नाही तरी तसेच सदर वरील सर्व बाबींचा मे.साहेबांनी सहनुमतीचा विचार करून आम्हा मरशिवणी तांडा १ व २ वरील विकास कामे करून मिळण्याची हमी घ्यावी व तसेच वरील सर्व कामे सुरू करण्याची मुदत १५ दिवसाची असेल अन्यथा दि:- ५/१२/२०२२ रोजी तहसील कार्यालय, अहमदपूर समोर अखिल भारतीय बंजारा क्रांतिदल तालुका अध्यक्ष अहमदपूर यांच्या वतीने आमरण उपोषनास आहोत असे मरशिवणी १ व २ गावातील नागरिक यांनी सांगितले
