
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
पेठवडज :-: कंधार तालुक्यातील पेठवडज येथील डाव्या कालव्याच्या दुरूस्तीचे काम सध्या सुरू असून ते काम अरूंद व कमी प्रमाणात खोदून तयार केले जात आहे.या धरणाच्या डाव्या कालव्याच्या पाण्याच्या पाळ्या शेवटपर्यंत जात नाहीत.कालवा व्यवस्थित शेवटपर्यंत काम करत नाहीत . अनेक ठिकाणी कालव्याच्या दोन्ही बाजूंनी मोटारी लावून पाणी उपसीले जाते.गेट सोडून अनेक ठिकाणी पाईप टाकलेले आहेत.हे सर्व मा.अधिक्षक अभियंता पाटबंधारे विभाग नांदेड व शाखा अभियंता पाटबंधारे विभाग नांदेड यांना कळवून सुद्धा कर्मचारी व अधिकारी यांना पाठीशी घालत आहेत. त्यामुळे कालव्याचे पाणी शेवटपर्यंत जात नाही.याची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व्यंकटी गोविंद जाधव व पांडुरंग व्यंकटी .कंधारे माधव ईभुते. कंधारे.गणेश कैलासे व. इतर शेतकरी यांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन मागणी केली आहे.व वरील मागणीची प्रस्तावना न केल्यास जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे