
दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
मुखेड तालुक्यात शिवसेना तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे आणि बहुजन चळवळीचे नेते दशरथ लोहबंदे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात विक्रमी १२ हजार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सदस्य नोंदणी करण्यात आली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, नांदेड जिल्हा संपर्क प्रमुख बबनराव थोरात, उपजिल्हा प्रमुख भालचंद्र नाईक यांच्या आदेशाने तालुक्यात मागील १ महिन्यापासून सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली होती. तालुक्यात सावरगाव, जांब, मुक्रामाबाद, बाऱ्हाळी, येवती, मुखेड शहर या ठिकाणी सदस्य नोंदणी अभियान एक दिवसीय कार्यक्रम घेऊन सदस्य नोंदणी करण्यात आली.
या सदस्य नोंदणी अभियानात बालाजी बंडे, तालुका संघटक शंकर पिटलेवाड, उपतालुका प्रमुख मन्मथ खंकरे, उपतालुका प्रमुख विजय मंगलगे, शरद कोडगिरे, शिवाजी गेडेवाड शहरप्रमुख शंकर चिंतमवाड, पांडुरंग अडगुलवाड, युवासेनेचे बालाजी पाटील ढोसने, माधव देवकत्ते, तुकाराम पाटील सुडके योगेश मामीलवाड, संतोष घाळेवाड, अनिल लोखंडे, योगेश मरकंटवाड यांच्यासह तालुक्यातील विभाग प्रमुख, शाखा प्रमुख आणि गट प्रमुखांनी सदस्य नोंदणी अभियानात परिश्रम घेतले आहे.
संपूर्ण नांदेड जिल्ह्यात मुखेड मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची विक्रमी १२ हजार सदस्य नोंदणी आतापर्यंत करण्यात आली आहे. या सदस्य नोंदणी अभियानामुळे शिवसेना पक्षातील सर्व जुने शिवसैनिक जुडले आहेत. या सदस्य नोंदणी अभियानाचा फायदा येणाऱ्या निवडणुकीत नक्कीच होईल.
— दशरथ लोहबंदे
मुखेड तालुक्यात आतापर्यंत शिवसेना पक्षाची विक्रमी १२ हजार सदस्य नोंदणी करण्यात आली असून अजून तालुक्यात सदस्य नोंदणी चालु आहे. या सदस्य नोंदणी अभियानमुळे सर्व शिवसैनिक ॲक्टिव मोड वर आले असून तालुक्यात पक्ष झपाट्याने वाढत आहे. या अभियानामुळे जुने आणि नव्याने शिवसैनिक मोठ्या प्रमाणात जुळत आहेत.
—— तालुका प्रमुख नागनाथ लोखंडे