
या अर्थतज्ज्ञांचा जगाला हादरवणारा इशारा म्हणाले; सर्वाधिक भारतात…
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर मोठा टॅरिफ लावला. फक्त भारतच नाही तर अनेक देशांना टॅरिफच्या धमक्या ते देत आहेत. स्वत: अमेरिकेतूनच या टॅरिफला जोरदार विरोध होत आहे. भारताने रशियाकडून तेल खरेदी बंद करावी, याकरिता त्यांनी भारतावर 50 टक्के टॅरिफ लावण्याचा धक्कादायक निर्णय घेतला.
भारताने इतक्या मोठ्या प्रमाणात टॅरिफ लावूनही अमेरिकेच्या अटी मान्य केल्या नाहीत. भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवली. अमेरिकेने लावलेल्या टॅरिफचा फटका भारतात बसतोय. भारतासाठी अमेरिका ही एक मोठी बाजारपेठ राहिली आहे. टॅरिफमुळे निर्यात खूप कमी होत आहे. आता डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफ कोरोनापेक्षाही भयंकर असल्याचा दावा, एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (एआयआयबी) चे मुख्य अर्थतज्ज्ञ एरिक बर्ग्लॉफ यांनी केला.
एरिक बर्ग्लॉफ यांनी नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये म्हटले की, कोरोना आणि जागतिक आर्थिक संकटापेक्षाही अमेरिकेचा टॅरिफ (शुल्क) अधिक घातक असून त्यामुळे जास्त अनिश्चितता निर्माण झाली आहे. अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम जवळपास सर्वच देशांवर होताना दिसतोय. भारतावर याचा परिणाम सर्वाधिक जाणवत आहे. धोरणात्मक अनिश्चिततेची ही पातळी जास्त आहे, कोरोना महामारी आणि जागतिक आर्थिक संकटाच्या काळापेक्षाही अधिक.
टॅरिफमुळे गुंतवणूक आणि व्यापारावर मोठा खर्च येतोय. त्याचा आर्थिक वाढीवरही मोठा परिणाम होईल. गेल्या काही दिवसांपासून जगातील शुल्क अधिक वाढताना दिसत आहे. त्यांनी पुढे म्हटले की, चीन सरकार अमेरिकेच्या टॅरिफचा सडेतोड उत्तर देण्यासाठी तयार होते. चीनकडे काही क्षेत्रामध्ये मोठी शक्ती आहे. त्यामुळेच त्यांना अशाप्रकारच्या गोष्टींपासून वाचण्यास थेट मदत होते.
भारताला काही क्षेत्रांमध्ये निश्चितपणे फायदा झाला. अॅपल आणि फॉक्सकॉनने केलेल्या कामांमुळे त्यांना फायदा झाला आहे. अनेक कंपन्या भारतात आल्या आहेत आणि अजूनही येत आहेत. भारत ही एक मोठी आणि वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. याच गोष्टीमुळे भारतीय आणि परदेशी कंपन्या भारतात रस दाखवत आहेत. याचा अधिक फायदा भारताला मोठ्या प्रमाणात भविष्यात होईल, असेही त्यांनी यावेळी म्हटले आहे.