
दैनिक चालु वार्ता मुखेड ता. प्रतिनिधी -सुरेश जमदाडे
मुखेड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर बोधगिरे, पोलिस उपनिरीक्षक गजानन काळे, पोलिस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे यांनी आपले कर्तव्य बजावत उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचे पोलिस अधीक्षक कार्यालय नांदेड यांच्याकडून प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले.
तालुक्यातील बावनवाडी येथे ऑक्टोबर महिन्यात काही चोरांनी निझामाबाद हून आलेल्या व्यापाऱ्याला लुटले होते त्या प्रकरणातील गुन्हा रजिस्टर नंबर २६९/२०२२ कलम ३९५ भादवी मधील ४ आरोपी अटक करून १ लाख ४० हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून उत्तम कामगिरी केले आहे.
या कामगिरीबद्दल पोलिस निरीक्षक विलास गोबाडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर बोधगिरे, पोलिस उपनिरीक्षक गजानन काळे, पोलिस उपनिरीक्षक गजानन अन्सापुरे यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आले.