
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
खानवडी (ता.पुरंदर) येथे होणा-या पंधराव्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ओबीसी महा मंडळाचे माजी अध्यक्ष अविनाश ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. निमंत्रक पदी गणेश जगताप व सुनील धिवार यांची निवड करण्यात आली आहे. अशी माहिती संमेलनाचे मुख्य संयोजक व ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव यांनी दिली.
महात्मा फुले यांच्या मूळ खानवडी गावी दि. २७ नोव्हेंबर रोजी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाचे स्वागताध्यक्ष अॕड शिवाजी कोलते आहेत.
संमेलनाध्यक्ष श्री अविनाश ठाकरे हे माजी अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) महाराष्ट्र राज्य ओबीसी महामंडळ,
सत्तापक्ष नेता मनपा नागपूर, माजी अधक्ष स्थायी समीती मनपा नागपूर, विश्वस्त अखिल भारतीय महानुभाव परीषद आदी ठिकाणी काम करत आहेत, सामाजिक व राजकीय क्षेत्रात गेली वीस वर्षे नागपूर महानगरपालिका क्षेत्रात काम करीत आहे. संमेलनास उद़्घाटक म्हणून महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली ताई चाकणकर आहेत.
प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सजंय जगताप, माजी मंत्री विजयबापू शिवतारे, माजी आमदार अशोकराव टेकवडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयराव कोलते, माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामआप्पा इंगळे, अखिल भारतीय मराठा महासंघ अध्यक्ष राजेंद्र कोंढरे, जिल्हा परिषद सदस्य दत्ताशेठ झुरुंगे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक अध्यक्ष डाँ. दिगंबर दुर्गाडे आदी उपस्थित राहणार आहेत. या संमेलनात ग्रंथपूजन, उदघाटन समारंभ, पुरस्कार वितरण, कथाकथन, नाट्यप्रयोग, परिसंवाद, कविसंमेलन असे भरगच्च कार्यक्रम होणार आहेत.
दुपारी १२:३० वा. संमेलनाचे उदघाटन होणार असून, दुपारी २:३० वा. समाजसुधारक महात्मा फुले या विषयावर डॉ अरुण कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार असून, योगिता कोकरे, डाँ जगदीश शेवते, गणेश फरताळे सहभागी होणार आहेत. कवयित्री स्वाती बंगाळे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होणार आहे,
यापूर्वी झालेल्या महात्मा फुले साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद साहित्य मार्तंड यशवंतराव सावंत, इतिहासाचार्य मा.म.देशमुख, म.भा.चव्हाण, प्रा.गंगाधर बनबरे, इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे, प्रा. रतनलाल सोनग्रा, डाँ सय्यद जब्बार पटेल, डाँ जयप्रकाश घुमटकर, दशरथ यादव, भा.ल.ठाणगे, रावसाहेब पवार यांनी भुषविले आहे. संमेलनाचे संयोजन राजाभाऊ जगताप, दत्तानाना भोंगळे, गंगाराम जाधव, शामराव मेमाणे, सुनील लोणकर, नंदकुमार दिवसे, दत्ता कड, रवींद्र फुले, दत्ता होले यांनी केले आहे.अशी माहिती माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अरुण तिखे यांनी दिली