
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा.. तालुक्यातील रब्बी हंगामात पिकाची खुरपणी , फवारणी आणि पिकांना पाणी, हरभरा कोळपणी गव्हाला पाणि देण्याच्या कामाला वेग आलेला दिसतो. शेतकरी मजुर शेतीचे काम उत्साहाने करत असुन शेतकऱ्यांमध्ये शेती पिकवण्यासाठीची धडपडही दिसत आहे.
सध्या रब्बी हंगामातील अतिशय महत्त्वाचे हरभरा पिक समजले जाते आणि सध्या या पिकामध्ये खुरपणी, भाजी खुडने काडी कचरा वेचणे इत्यादी मोठ्या संख्येने महिला काम करत दिसत आहे आणि पुरुष हरभरा कोळपणी दुसरे पिकाला पाणी देण्यासाठी धावपळ स्पिंकलरच्या द्वारे करीत आहे. पिकाला पाणी स्प्रिंकलरने देण्याचीही गरज भासत आहे .
पिकाला वाचवण्याकरता कसरत शेतकऱ्यांमध्ये पाहायला मिळत आहे.
अतिशय पोषक वातावरण मध्ये प्रचंड प्रमाणात पिकामध्ये वाढ पाहायला मिळत आहे व शेतकरी वर्गात आनंदमय वातावरण पाहायला
मिळत आहे. सध्याच्या परिस्थिती चांगले पीक टवटवीत दिसत आहे. परंतु यापुढेही वातावरण नैसर्गिक बदलांमध्ये परिणाम पाहायला दिसतील याची चिंता शेतकऱ्यांना वाटत आहे.