
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : जिंतूर रोडवरील एका महाविद्यालयात इयत्ता १२ मध्ये शिकणाऱ्या दोन तरुणी बेपत्ता झाल्या आहेत. याप्रकरणी पालकांनी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. दोन तीन दिवसांपूर्वीच शहरातील विविध भागांतून वेगवेगळी कारणं सांगून घराबाहेर पडलेल्या २१ व २२. वयाच्या दोन तरुणी घरी परतल्याची नाहीत. आश्चर्यकारक बाब म्हणजे यावेळी अन्य तीन अल्पवयीन बालकांचेही अपहरण झाले होते. एकापाठोपाठ एक अशा अपहरणाच्या का बेपत्ता होण्याच्या या प्रकरणामुळे पालक व पोलिसांची सुध्दा चिंता वाढली जाणे स्वाभाविक आहे.
परभणी तालुक्यातील नांदापूर येथे राहाणाऱ्या व जिंतूर रोडवरील एका कॉलेजात इ.१२वीत शिकणाऱ्या गायब दोन्ही मुली आप्तेष्ट असल्याचे बोलले जात आहे. त्या दोघीही मिळूनच दररोज घर ते कॉलेज दरम्यान पायीच येणे जाणे करीत होत्या असे पालकांनी सांगितले. तथापि १२ डिसेंबर रोजी नेहमीप्रमाणे सकाळी सात वाजता घर सोडलेल्या या दोन्ही दुपारी तीन वाजेपर्यंत घरी परत येणे अपेक्षित असताना तसे घडलेच नाही. त्यामुळे चिंतातूर झालेल्या पालकांनी प्रथम कॉलेज, नंतर आप्तेष्ट, शिक्षक व मित्र-मैत्रिणींकडे चौकशी केली असता त्यांचा कुठेही ठावठिकाणा लागला नाही. बस स्थानक, रेल्वे स्थानक वा रिक्षा स्टँडवर शोध घेतला असता त्या मिळून आल्या नाहीत. दुसऱ्या दिवशीही त्या कॉलेजला व घरी सुद्धा न आल्याने चिंतातूर झालेले पालक मात्र पूरते हताश झाले व नंतर थेट कोतवाली पोलिसांत पोहोचले. इंत्थंभूत चौकशीअंती पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेता कोतवाली पोलीस ठाण्याचे सपोनि. बळवंत जमादार व पोलीस कर्मचारी गौस यांच्या पथकाने सदर तरुणींच्या शोधासाठी भरारी घेतली आहे.
दरम्यान मागील काही दिवसांपासून परभणी शहर व परिसरातून अल्पवयीन व सज्ञान तरुणींचे गायब होणे किंवा त्यांना जाणीवपूर्वक गायब केले जाणे या प्रकारात होत असलेली वाढ पालकांना चिंतातूर करणारी तर आहेच त्याशिवाय पोलिसांची सुध्दा निंद हराम करणाऱ्या एकापाठोपाठ एक अशा अनेक घटना घडत आहेत. पालकांनी व पोलिसांनीही सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे वाटत आहे. पोलिसांना गस्त वाढवावी लागणार आहे तर पालकांची सुध्दा कसोटी लागणार आहे जणू असेच चित्र सध्या तरी दिसत आहे.