
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर :- दिनांक 14.12.2022 रोजी 10.30 वा. चे सुमारास, कल्याण टोलनाका वन्नाळी ता. देगलूर जि. नांदेड येथे, यातील नमुद तीन आरोपीतांनी संगणमत करुन अनाधिकृतपणे स्वस्त धान्य दुकानातील धान्य गहु, तांदुळ असा एकुण 35,450 /- रुपयाचा माल पिकअप क्र. एम. एच. / 12- एक्स – 1362 मध्ये काळया बाजारात विक्री साठी घेवून जात असताना दिसून आले.
फिर्यादी बालाजी गोविंदराव मिटेवाड, वय 41 वर्षे रा. व्यवसाय निरीक्षण अधिकारी पुरवठा विभाग, तहसील कार्यालय देगलूर, ता. देगलूर जि. नांदेड यांनी दिलेल्या फिर्यादवरुन पोस्टे देगलूर गुरनं 546 / 2022 कलम जिवनावश्यक वस्तु अधिनियम 1955 कलम 37 कायदा प्रमाणे गुन्हा दाखल असून तपास पोहेकॉ / 832
पुढील तपास काळे, सर करत आहेत.