
दैनिक चालु वार्ता औरंगाबाद उपसंपादक -मोहन आखाडे
हिंदवी स्वराज्य निर्मितीवेळी ग्रामसंस्था म्हणजे गावगाडा नीट चालावात म्हणुन छत्रपती शिवाजी महाराजांनी ‘पाटील’ हे पद निर्माण करून रयतेची सेवा करण्याची संधी दिली . पुढे ते पद पेशवेकाळात, ब्रिटिश सरकारात कायम आहे . पोलीस पाटील ग्रामव्यवस्था व प्रशासनातील दुवा आहे . ग्राम पोलीस अधिनियम१९६७ चा कायदा अस्तित्वात आल्यावर पोलीस पाटील या गाव पातळी वरील शेवटच्या घटकाची निर्मिती झाली . त्यामुळे १७ डिसेंबर१९६७ ला पोलीस पाटील या पदाला कायदेशिर शासन मान्यता प्राप्त झाली त्यामुळे तेंव्हा पासुन१७ डिसेंबर हा दिवस “पोलीस पाटील” दिन म्हणुन साजरा करण्यात येतो . स्वराज्य काळापासुन ग्रामसंस्था व्यवस्थित चालवण्यासाठी गावप्रमुखाची महाराजांकडुन नेमणुक होत असे . पाटील गाव पातळीवर आजच्या तलाठी, ग्रामसेवक, कृषी आधिकारी व सरपंच यांची भुमिका पार पाडत असत . सर्व अधिकार पाडलास असल्याने जनता न्याय निवाड्यासाठी पाटलांकडे जात असत . पुढे ही मंडळी वतनाधिकारी बनले . हिंदवी स्वराज्यात छत्रपती शिवरायांनी गाव पातळीवर मुख्य व्यक्ती म्हणुन पाटील हे पद निर्माण केले . या पदावर कर्तृत्ववान, शुर व धाडसी व्यक्तीची नेमणुक करत असे . पुढे पेशवे काळात कायदा सुव्यवस्था राखण्यास कोतवालीस महत्व प्राप्त झाले . पाटलास शेतसारा गोळा करणे, जमिनीच्या नोंदी,गावात शांतता राखणे, गुन्हेगारीस आळा बसवणे ही कामे प्रामुख्याने करावी लागत असे . संकट काळी गावात सैन्य निर्माण करून स्वराज्याच्या सेवेत हजर रहावे लागत असे . त्यामुळे स्वराज्यात गावगाडा चालवत असतांना न्यायपूर्ण वर्तवणुकीमुळे अनेक पाटील इतिहासात नावारुपाला आले . पाटील, कुलकर्णी, चौगुले, देशमुख, देशपांडे, शेटे, महाजन ही ग्रामसंस्था राखण्यासाठी पदे होती ती पुढे आडणाव झाली . पाटलाला मदत करण्यासाठी चौगुला, कुलकर्णी, नायकवाडी, कोतवाल, हवालदार, शेतसनदी (गाव लष्कर ) कुळवाडी यांच्यासह बारा बलुतेदार होते . हा दबदबा पाहुन ‘उतरंडीला नसेना दाणा, पण दादल्या असावा पाटील राणा’ ही म्हण प्रचलीत होऊन रुढ झाली . ब्रिटिश कालखंडात ग्राम कारभार पाहण्यासाठी बाँम्बे सिव्हील ॲक्ट१८५७ नुसार पाटील पदाची कायदेशिर निर्मिती करण्यात आली . त्यावेळी मुलकी पाटील म्हणुन नेमणुक होत असे . ते वंशपरंपरागत चालत असे . महसुल व पोलीस यांची सर्व कामे त्यांना करावी लागत असे . वंशपरंपरागत पदाने अन्याय वाढु नये म्हणुन स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ‘महाराष्ट्र मुलकी पोलीस अधिनियम१९६२ अन्वये’ १ जानेवारी१९६२ पासुन वंशपरंपरागत मुलकी पाटलाच पद रद्द करण्यात आल . पुढे ‘महाराष्ट्र ग्राम अधिनियम१९६७’ नुसार स्वतंत्र महसुली गावांना प्रांताधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी यांच्याकडुन पोलीस पाटलांची नियुक्ती केली जाते . आज पोलीस पाटलांची जबाबदारी गावात कायदा व सुव्यस्था राखणे, गाव व कार्यक्षेत्रातल्या गुन्ह्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात देणे, नैसर्गिक परिस्थिती व अहवाल वरीष्ठांना देणे व आपातकालीन परिस्थिती मध्ये आपत्ती व्यवस्थापन करून घेणे व गावात सामाजिक सौर्हाद राखणे इत्यादी आहे .आता नविन कायदेशिर अधिनियमानुसार पोलीस पाटील पदासाठी महिलांना व विविध जातीधर्मातील सर्व घटकांना आरक्षण देण्यात आले आहे . नविन पोलीस पाटील भरती मध्ये उच्चशिक्षित युवक युवतीची गुणवत्तापूर्ण निवड झालेली आहे . त्यामुळे त्यांना फक्त २०० रु रोजंदारीवर २४ तास काम करावे लागत आहे. पोलीस पाटील पद स्विकारल्यास खाजगी नोकरी करता येत नाही . पोलीस पाटलांचे जीवनमान उंचावण्यासाठी व त्यांना अधिक सक्षमतेनं काम करता यावे म्हणुन पोलीस पाटलांच्या मानधनात अपेक्षित अशी किमान १८००० रु वाढ व्हावी . तसेच पोलीस पाटलांना विभागातील उन्नती ( डिपार्टमेंन्टल प्रमोशन ) योजने नुसार शासनच्या इतर भरती मध्ये पोलीस पाटलांसाठी काही जागा राखाव ठेवण्यात याव्यात. पोलीस पाटलांना चांगले प्रशिक्षण देऊन काम करण्यास अधिक सक्षम करावे . तसेच शासनाच्या वतीने पोलीस पाटलांना त्यांच्या उत्कृष्ट कार्य व शौर्या बद्दल राज्यपाल पुरस्कार व महासंचालक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते .या पुढेही उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पोलीस पाटलांना प्रांत, जिल्हा, राज्य स्तरावर विविध पुरस्काराने सन्मानित करून पोलीस पाटलांचे मनोधर्य उंचवावे त्यांना अधिक चांगल काम करण्यास प्रोत्साहित करावे .पोलीस पाटील हा प्रशासन व गावकरी यांच्यातील दुव्याचे महत्वपुर्ण काम करत आलेला आहे व यापुढेही सदैव प्रामणिकपणे करत राहिल .ग्रामीण चित्रपट, तमाशातुन, गाण्या मधुन गावचा पाटील हा नेहमीच खलनायक, रंगेल, रगेल, शोषक, भ्रष्टाचारी, बाईलवेडा दाखवला जातो यातुन पाटील हा विनोदाचा,चेष्टेचा विषय ठरला होता . परंतु शासनाने १७ डिसेंबर १९६७ रोजी ग्राम पोलीस पाटील१९६७ चा अधिनियम लागु केला त्यामुळे प्रत्येक पोलीस पाटलांच्या जीवनात १७ डिसेंबर चे एक अनन्य साधारण महत्व आहे .१७ डिसेंबर १९६७ ला पोलीस पाटलाची एक वेगळी ओळख निर्माण झाली . आणि २०१९ साली आलेल्या कोरोना सारख्या महामारी संकटात व गावावर आलेल्या कुठल्याही नैसर्गिक आपत्ती प्रसंगी पोलीस पाटीला हा ग्राम सुरक्षेसाठी एखाद्या स्तंभासारखा योद्धा म्हणुन उभा राहिला .ग्रामसंस्था मधील तो नायक म्हणुनच दिवस रात्र राबला तो गावचा पाटील शासन दरबारी उपेक्षित राहता कामा नये . म्हणुन शासनाने त्वरित पोलीस पाटलांचे मानधन वाढ करणे, नुतनीकरण कादमचे बंद करणे, विमा संरक्षण देणे, जिल्हा स्तरावर पोलीस पाटील भवन उभारणे, निवृत्ती वय ६० वरून ६५ करणे, थकित प्रवास भत्ता त्वरित अदा करणे व निवृत्तीच्या वेळी एक रकमी दहा लाख रुपये देण्यात यावे .या व इतर प्रलंबित मागण्या मंजुर करून पोलीस पाटलांना अर्थिक व सामाजिक दृष्ट्या सक्षम करावे हिच शासनाकडुन माफक अपेक्षा …..!
श्री कारभारी निघोटे पाटील – राज्य समन्वयक पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र . सौ सुनंदा पोपटराव शिंदे पाटील मराठवाडा विभागिय अध्यक्ष पोलीस पाटील संघटना महाराष्ट्र .