
दैनिक चालू वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी काल शनिवार दिनांक 17 रोजी दक्षिण भारतातील सुप्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र खंडोबा रायाच्या यात्रेनिमित्त माळेगाव यात्रेतील रस्ते,वीज, पाणी, कुस्तीच्या मैदानाची पाहणी करून यात्रेतील सर्व सोयी सुविधांचा आढावा घेतला, यावेळी उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय तुबाकले, उपविभागीय पोलीस अधिकारी मारुती थोरात, लोह्याचे पोलीस निरीक्षक संतोष तांबे, गटविकास अधिकारी शैलेश वावळे,जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील, कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर पाटील चोंडे, संदीप पाटील उमरेकर,उपसभापती अरुण पाटील कदम, उपसभापती श्याम अण्णा पवार, माळाकोळीचे पोलीस निरीक्षक माणिक डोके, माळाकोळी चे सरपंच मोहन काका शूर, माळेगावचे सरपंच हनुमंतराव धुळगंडे, एमएससीबी इंजि.सोरगे सह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते, यावेळी माळेगाव यात्रेच्या अनुषंगाने आमदार शिंदे यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून यात्रा काळात देशातील अनेक प्रांतातून छोटे-मोठे व्यापाऱ्यासह लाखो भाविक भक्त मोठ्या प्रमाणात माळेगाव यात्रेमध्ये दाखल होतात यामुळे भाविक भक्तांची कसलीही गैरसोय होणार नाही याची अधिकाऱ्यांनी काळजी घ्यावी व यात्रा काळात स्वच्छ पिण्याचे पाणी वीज व इतर मूलभूत सुविधा यात्रेकरूंना उपलब्ध झाल्या पाहिजे व यात्रा काळात महिलां भगिनी व अबालवृद्धांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही व त्यांच्या सुरक्षित तेची जबाबदारी म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश यावेळी आमदार शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले, श्रीक्षेत्र खंडोबा रायाची यात्रा अत्यंत उत्साहात व शांततेत संपन्न व्हावी व यात्रा काळात कसलाही अनुचित प्रकार होणार नाही याची सर्व अधिकाऱ्यांनी दक्षता घेण्याचे निर्देश ही यावेळी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी अधिकाऱ्यांना दिले.