
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ग्रामीण प्रतिनिधी-विष्णू पोले.
अहमदपूर :- सध्या महराष्ट्रभर जवळपास ७७५१ ग्रामपंचायतीच्या निवडणुका लागल्या आहेत.दर वेळची निवणूक म्हणजे काही तरी बदलाची अपेक्षा,पण सध्या विकासात्मक बद्दल खेडेगावात होतोय का? तर याचं उत्तर एकच आहे विकास सोडून गावात सर्व बद्दल होत आहेत.जो आता १८ वर्ष पूर्ण करून नव्याने मतदार बनलाय त्याला आज पर्यंत जात ही कागदावरची माहित होती पण या ग्रामपंचायती ने त्याला प्रत्यक्षात दाखवून दिली आहे.ज्या वेळेस त्याच्या मनात दुसऱ्या समाजाबद्दल द्वेष निर्माण झाला त्याच दिवशी तो माणूस म्हणून दुसऱ्याकडे बघायला आंधळा झाला हा झालेला बद्दल. जो व्यक्ती घर,शेतीआणी कुटुंब या मध्ये रमायचा त्याची गाठ कार्यकर्त्याशी पडली त्याच्या शब्दांच्या आकर्षणाने त्याने थोडी घेतली मजा म्हणून निवडणुका संपल्या पण त्याच आकर्षण दारू बदलच महिन्यातून एकदा पासून सुरु झाल ते मला ते घेतल्याशिवाय जमतच नाही इथे पोहचलं दर वर्षी असे काही मेम्बर निवडणुकीतून बेवडे होण्याकडे वाटचाल करतात हा बद्दल आहे.भावकी ,वाडा, खांब या मध्ये खूप बद्दल झाले प्रयत्येकाची राजकीय इच्छाशक्ती वेगळी मग घरा घरात उमेदवार आणी पाच वर्षनाही तर पाच पिढ्यापर्यंत संपवण्याची भाषा,अगोदर एकाच घरात राहिलेली भावंड एकमेकांना संपवण्या पर्यंत हा बद्दल.निवडणुकीत भाऊ,दादा भैया, यांच्या पाठीमागे राहून आयते खाण्याची लागलेली सवय त्यामुळे आलेला मिंधे पणा आणी विकलेला स्वाभिमान चांगला सुशिक्षित मुलगा,कार्यकर्ता ते वाया गेलेला मुलगा हा निवडणुकीने युवकामध्ये केलेला बद्दल आहे हे सत्य आपल्याला नाकाकरून चालणार नाही.प्रत्येक गावात चांगल्या पद्धतीने गाव सांभाळू शकतील अशी बरीच सुशिक्षित युवक आहेत पण जे प्रस्थापित गावात मोठेपणा मिरवणारे,ग्रामपंचायतीच ‘ग’ समजत नाही पण पुढार पण माझ्याकडच राहावं ही नवीन युवा पोर गावगाड्यातील राजकारणात आली तर आपल वजन,रुबाब कमी होईल ह्या खोटया मोठेपणासाठी युवकांना दूर फेकलं जातंय आणी युवक पण त्यांच्या खोटया गप्पाना बळी पडतात आणी कालांतराने त्यांचा समाजाकडं बघण्याचा आणी समाज सेवे बद्दलचा दृष्टिकोन बदलतो. पैसा ज्यांच्याकडं आहे त्यांना प्रतिष्ठा हवीय म्हणून त्याना राजकारणात यायचय त्यांना विकासाशी काही देणंघेणं नाही .अनेक खेड्या गावातील जुनी जाणती म्हातारी लोक म्हणतात आमचा गाव खूप चांगला होता पण अमुक तो निवडणुकीत उभा राहिला आणी आमच्या गावचा सत्यानाश झाला.गावातील असे नुकसान कारक बद्दल होऊ द्याचे नसतील तर आपन् माणूस म्हणून योग्य विचार करण्याची वेळ आहे.अनेक कुटुंब या निवडणुकीच्या काळात उध्वस्ततेकडे वाटचाल करतात.या निवडणुकीच्या काळात आपण आपल्या स्वतामध्ये माणूस म्हणून बद्दल घडवला तर हे नुकसान कारक बद्दल होणार नाहीत म्हणून आपल्याच स्वतः पासून बदलाची सुरुवात करावी लागेल.