
दैनिक चालू वार्ता वृत्तसेवा –
नांदेड—महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेच्यावतीने तालुका शाखा लोहा च्यावतीने गटसाधन केंद्र पंचायत समिती लोहा येथे गटशिक्षणाधिकारी रवींद्र सोनटक्के यांची शिक्षणाधिकारी (यो.) जिल्हा परिषद भंडारा येथे पदोन्नतीने नियुक्ती झाली व त्यांना शिक्षणाधिकारी (प्रा.)जिल्हा परिषद भंडारा चा अतिरिक्त पदभार दिल्याबद्दल नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी राज्य उपाध्यक्ष जी.एस. मंगनाळे, शिक्षण विस्तार अधिकारी सतीश व्यवहारे,एस.एन. आंबलवाड , राज्य संघटक अशोक मोरे, केंद्रप्रमुख मदन नायके , भास्कर होनराव,एस.एन.कसबे, जिल्हा सल्लागार एस.आर.केंद्रे, केंद्रीय मुख्याध्यापक डी.आर शिंदे, रामदास कस्तुरे, शिक्षक नेते रमेश पवार,संजय अकोले,आर.एल.चव्हाण,हावगिर जामकर, बाळु चव्हाण,राजकुमार यादव, दशरथ मेकाले,मनोहर शितळे, हिरामण मोरे,संतोष कुलकर्णी, जयराम पाटील ,किरण राठोड, भास्कर कल्याणकस्तुरे, आदी पदाधिकारी सह इतर मान्यवर उपस्थित होते.